शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर कंपन्यांच्या २ हजार कोटींच्या विद्युत शुल्कमाफीची चौकशी होणार; बावनकुळेंच्या प्रश्नाला पवारांचं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 19:47 IST

विदर्भ मराठवाड्याच्या मागासलेपणाचा विचार करून देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात उद्योगांचे विद्युत शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात मोबाईल टॉवर कंपन्यांचा समावेश नव्हता. पण...

मुंबई : महाराष्ट्रात उद्योगांना मिळणारी विद्युत शुल्कमाफी मोबाईल टॉवर्स कंपन्यांना कुठल्या आधारे देण्यात आली, याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिले आहे. 

विदर्भ मराठवाड्याच्या मागासलेपणाचा विचार करून देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात उद्योगांचे विद्युत शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात मोबाईल टॉवर कंपन्यांचा समावेश नव्हता. परंतु महाविकास आघाडी सरकारने एमएआरसीची परवानगी न घेता थेट मोबाईल टॉवर कंपन्यांचे विद्युत शुल्क माफ केले. या निर्णयामुळे राज्याचे २ हजार कोटींचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती देत, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यावर उप मुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.  चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आज महाराष्ट्रातील तीनही विद्युत निर्मिती कंपन्या तोट्यात असल्याचे सांगितल्या जाते. त्यामुळे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊर्जा मंत्रालयाचे वही खाते तपासावे. कारण २०१४ पूर्वी ऊर्जामंत्रालयाचे थकीत १४ हजार कोटींच्या घरात होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये हे थकीत ४२ हजार कोटी झाले. तरीही त्यावेळी राज्यातील तीनही विद्युत निर्मिती कंपन्या ४ हजार ७१५ कोटी रुपयांच्या नफ्यात होत्या. मग आत्ता त्या तोट्या का गेल्या हे तपासून बघावे लागेल. 

२८ कोटींच्या सबसिडीचा घोळ काय? जालन्यातील एसआरजे पीटी स्टील कंपनीच्या विनंतीवर ऊर्जा मंत्रालयाने तब्बल २८ कोटींची सबसिडी बहाल केली. महत्वाचे म्हणजे या परवानगीसाठी लागणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांच्या सह्या अल्पावधीत प्राप्त झाल्या. परंतु नियमात बसत नसल्याने कंपनीचा विनंती महावितरणकडून समंत करवून घेतला गेल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ऊर्जा मंत्रालयाने, अशा खिरापती वाटून खेळखंडोबा करवून घेण्यापेक्षा शेतकऱ्यांना वीज देण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारelectricityवीज