शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ऊस गाळपासाठी १९६ कारखान्यांचे अर्ज : २० आॅक्टोबर पासून हंगाम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 19:43 IST

यंदा गाळपासाठी १०० सहकारी आणि ९६ खासगी कारखान्यांनी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षी ९.०५ लाख हेक्टर जमिनीवर ऊस लागवड झाली होती.

ठळक मुद्देसाडेनऊशे लाख टन ऊस गाळपासाठी होईल उपलब्ध१ नोव्हेंबर ऐवजी ११ दिवस आधी हंगाम सुरु करण्याचा निर्णय

पुणे : आगामी ऊस गाळप हंगाम येत्या २० आॅक्टोबरपासून सुरु होत असून, त्यासाठी १९६ सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी अर्ज केला आहे. यंदा साडे नऊशे लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे. त्यामुळेच १ नोव्हेंबर ऐवजी ११ दिवस आधी हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी दिली. यंदा गाळपासाठी १०० सहकारी आणि ९६ खासगी कारखान्यांनी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षी ९.०५ लाख हेक्टर जमिनीवर ऊस लागवड झाली होती. तर त्यातून ९५३ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध झाला होता. तर, साखरेचे विक्रमी १०७ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा उसाचे क्षेत्र साडेअकरा लाख हेक्टरवर गेले आहे. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीचा ऊस गाळपाचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलेली ओढ, सोलापुर, औरंगाबाद आणि नगर येथे सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस आणि उसावर हुमणी रोग पडल्याने यंदा उत्पादकतेत घट होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी यावर्षी देखील साडेनऊशे लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. तर, साखरेचे उत्पादन १०५ लाख टन होईल असे सांगण्यात येत आहे. गाळपा अभावी ऊस शिल्लक राहू नये यासाठी गाळप हंगाम अलिकडे घेण्यात आला आहे.   

 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र