मुंबई : मध्य रेल्वेने रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुविधेसाठी १८ विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ८ ते १७ ऑगस्टच्या दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार असल्याने पर्यटनासाठी आणि गावाला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या एक्स्प्रेस मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)वरून मडगाव, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत.
अशा असतील विशेष एक्स्प्रेस सीएसएमटी - नागपूर - ६ फेऱ्या एलटीटी- मडगाव - ४ फेऱ्या सीएसएमटी -कोल्हापूर - २ फेऱ्या पुणे - नागपूर - ६ फेऱ्या