राज्यात 15% लसीकरण खासगी रुग्णालयात; पुणे, मुंबई आणि ठाणे शहरातील प्रमाण सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 10:02 AM2021-09-24T10:02:22+5:302021-09-24T10:02:45+5:30

राज्यात झालेल्या एकूण सात कोटी लसीकरणापैकी १ कोटी ३ लाख लसीकरण हे खासगी क्षेत्रात झाले आहे.

15% vaccination in private hospitals in the state; The highest proportion is in Pune, Mumbai and Thane | राज्यात 15% लसीकरण खासगी रुग्णालयात; पुणे, मुंबई आणि ठाणे शहरातील प्रमाण सर्वाधिक

राज्यात 15% लसीकरण खासगी रुग्णालयात; पुणे, मुंबई आणि ठाणे शहरातील प्रमाण सर्वाधिक

Next

मुंबई : राज्यात आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणात १५ टक्के लसीकरण हे खासगी क्षेत्रात झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यात सर्वाधिक प्रमाण पुणे, मुंबई आणि ठाणे शहरातील असून हे लसीकरण सशुल्क पद्धतीचे आहे. या तीन शहरांत ८५ टक्के लसीकरण खासगी क्षेत्रातील आहे.

खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लसींचा साठा अधिक असल्यामुळे लसीचा तुटवडा भासत नाही. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ९८ लाख लसींच्या डोसपैकी ६५ लाख कोविशिल्ड आणि ३३ लाख कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले. त्यातील ७० टक्के डोस हे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात देण्यात आले. त्यात ४० लाख कोविशिल्ड आणि २९ लाख कोव्हॅक्सिन लसींचा समावेश आहे. तर गोदरेज रुग्णालयाने ३ लाख लसींचे डोस, जसलोक आणि नानावटी रुग्णालयाने प्रत्येकी अडीच लाख लसींचे डोस देण्यात आले. सूर्या रुग्णालयात १ लाख लसींचे डोस दिले आहेत. शहर, उपगरातील अन्य १७० रुग्णालयांना केवळ काही हजारांत लसींचा डोससाठा प्राप्त झाला आहे.

राज्यात झालेल्या एकूण सात कोटी लसीकरणापैकी १ कोटी ३ लाख लसीकरण हे खासगी क्षेत्रात झाले आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील दोन तृतीयांश जिल्ह्यांत सशुल्क लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. मुंबईत ४३ लाख, पुण्यात २७ लाख, ठाण्यात १७ लाख लसींचे डोस खासगी क्षेत्रातील आहेत. त्यानंतर रायगड ३.३४ लाख, औरंगाबाद २.४१ लाख, नागपूर १.४६ लाख आणि कोल्हापूरमध्ये १.७ लाख लसींचे डोस खासगी क्षेत्रातील आहेत. 

तरुणांचे ८० टक्के लसीकरण 
मुंबईत तरुण लाभार्थ्यांचे ८० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, यातील ४३ टक्के लाभार्थ्यांनी खासगी क्षेत्राला पसंती दिली आहे. याखेरीज, नांदेडमध्ये ३० टक्के, हिंगोली ३३ टक्के आणि नंदुरबारमध्ये ३६ टक्के सशुल्क लसीकरण पार पडले आहे.

राज्यात ११ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस
- राज्यात बुधवारी ११ लाख ८ हजार ३१४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी ६१ लाख ६५ हजार ७६२ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. 

- राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २ कोटी ७४ लाख ५२ हजार ८१५ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ५४ लाख ८१ हजार ७९८  लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ३४ लाख ७२ हजार ७८३ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ३५ लाख  ५८ हजार २०१ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
 

Web Title: 15% vaccination in private hospitals in the state; The highest proportion is in Pune, Mumbai and Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.