बनावट शालार्थ आयडीद्वारे हडपले वेतनाचे सव्वाकोटी; २० जणांवर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 06:47 IST2026-02-14T06:47:01+5:302026-02-14T06:47:38+5:30

मुंबई शिक्षण बोर्डाच्या वाशीतील कार्यालयात नोंद असलेल्या शिक्षकांच्याही नोंदी तपासल्या जात होत्या. त्यामध्ये काही शिक्षण संस्था, शिक्षक यांच्यामार्फत बनावट शालार्थ आयडी जमा करून शासनामार्फत वेतन घेतले जात असल्याचे दिसून आले

1.5 crores of salary was snatched through fake school ID; 20 people were booked for embezzlement | बनावट शालार्थ आयडीद्वारे हडपले वेतनाचे सव्वाकोटी; २० जणांवर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

बनावट शालार्थ आयडीद्वारे हडपले वेतनाचे सव्वाकोटी; २० जणांवर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

नवी मुंबई - मुंबईच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षासह २० जणांवर सव्वाकोटींच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात डोंबिवली, अलिबाग, खोपोली येथील शिक्षण संस्थांचे पदाधिकारी व शिक्षकांचा समावेश आहे. मंडळ अध्यक्षांच्या संमतीने त्यांनी बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनामार्फत वेतनाचे सव्वाकोटी लाटल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.

मुंबई शिक्षण बोर्डाच्या वाशीतील कार्यालयात नोंद असलेल्या शिक्षकांच्याही नोंदी तपासल्या जात होत्या. त्यामध्ये काही शिक्षण संस्था, शिक्षक यांच्यामार्फत बनावट शालार्थ आयडी जमा करून शासनामार्फत वेतन घेतले जात असल्याचे दिसून आले. तर शिक्षण मंडळाच्या कार्यालयात त्यांच्या नोंदीमध्ये शालार्थ आयडी नंबरची जागा रिकामी ठेवली होती. यावरून शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष नितीन उपासनी यांच्या संमतीने हा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई विभागाच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याद्वारे शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष नितीन उपासनी यांच्यासह विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी व शिक्षक अशा २० जणांवर गुन्हा नोंदवला.

राज्यात इतरही भागात असे प्रकार घडल्याची शक्यता
काही महिन्यांपूर्वी राज्याच्या इतरही काही भागांमध्ये अशाच प्रकारे बनावट शालार्थ आयडी तयार करून शिक्षक व शिक्षण संस्थांनी शासनाचे वेतन अनुदान लाटल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. मुंबई बोर्डातही हा प्रकार उघड झाल्याने व त्यात थेट तत्कालीन अध्यक्षच संशयाच्या घेऱ्यात आल्याने राज्याच्या इतरही भागात असे प्रकार घडले असल्याची शक्यता आहे.

...यांच्यावर गुन्हा दाखल 
मुंबई शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष नितीन उपासनी,  मिलिंद पाटील, तत्कालीन प्राचार्य अनिल पाटील, विद्यमान प्राचार्या सोनाली पाटील, सहशिक्षिका मयुरी पाटील, ज्येष्ठ पाटील, स्वप्नील राऊत, वैभव गोसावी. केएमसी संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य एन. बी. पवार यांच्यासह एन. रामास्वामी, डी. पी. हरिदास, एन. बी. खानविलकर, पी. जी. पाटील, विद्यमान प्राचार्य डी. पी. गायकवाड आदिंवर गुन्हा नोंदवला आहे.

Web Title : फर्जी आईडी घोटाला: करोड़ों का गबन, 20 पर धोखाधड़ी का मामला दर्ज

Web Summary : फर्जी आईडी के इस्तेमाल से करोड़ों के गबन के आरोप में मुंबई शिक्षा बोर्ड के पूर्व प्रमुख और 19 अन्य लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। डोंबिवली, अलीबाग और खोपोली के शिक्षा संस्थानों के अधिकारी शामिल हैं। घोटाले में सरकारी धन निकालने के लिए फर्जी आईडी बनाना शामिल था।

Web Title : Fake ID Scam: Crores Embezzled, 20 Booked for Fraud

Web Summary : Ex-Mumbai Education Board head and 19 others booked for embezzling crores using fake IDs. Officials from Dombivali, Alibag, and Khopoli education institutions are implicated. The scam involved creating bogus IDs to siphon government funds.