शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भातील १४ हजार शेतकर्‍यांची २३ कोटींची वीज देयके माफ

By admin | Updated: June 15, 2014 22:23 IST

पश्‍चिम विदर्भातील १४ हजार ३८0 शेतकर्‍यांची, २३ कोटी ६९ लाख रुपयांची वीज देयके माफ झालीे आहेत.

अकोला : गतवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या, पश्‍चिम विदर्भातील १४ हजार ३८0 शेतकर्‍यांची, २३ कोटी ६९ लाख रुपयांची वीज देयके माफ झालीे आहेत. गतवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचीे जानेवारी ते जून या सहा महिन्यातील कृषी पंपांची वीज देयके माफ करण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची देयके माफ करण्यात आली आहेत.गतवर्षी ओल्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणार्‍या अमरावती विभागातील शेतकर्‍यांना रब्बी हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसला. गारपीट व वादळी पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिके व फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अशातच महावितरणने देयके थकल्यामुळे विद्युत पुरवठा तोडण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे अनेक शेतकरी पीक वाचवू शकले नाहीत. अशा शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी, शासनाने जानेवारी ते जून २0१४ पर्यंत सहा महिन्यांची वीज देयके माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासनाने महसूल विभागाच्या अधिकार्‍यांकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या मागविल्या होत्या.याद्या प्राप्त झाल्यानंतर, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची वीज देयके माफ करण्यात आली. राज्यात एकूण ५ लाख ८७ हजार १४५ शेतकर्‍यांची ९२ कोटी ४९ लाख ४१ हजार रुपयांची वीज देयके माफ करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती परिमंडळात १४ हजार ३८0 शेतकर्‍यांचा समावेश आहे. एप्रिल ते जून या उर्वरित तीन महिन्यांची देयके पुढील टप्प्यात माफ करण्यात येणार आहेत.