शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

शिवसेना उमेदवारांना हरवणारे 14 जण 'ठाकरे सरकार'मध्ये मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 11:47 IST

भाजपा उमेदवारांचा पराभव करणारे 12 जण मंत्री

मुंबई: अनेक दिवसांपासून रखडलेलं उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप काल जाहीर झालं. महाविकास आघाडीतील मंत्र्यांचा शपथविधी आणि त्यांचं खातेवाटप यासाठी महिन्याभरापेक्षाही जास्त कालावधी लागला. उद्धव ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व जागा भरल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातील एक तृतीयांश सदस्य (14) शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव केलेले आहेत. तर 12 जणांनी भाजपा उमेदवाराचा पराभव केलेला आहे.उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी मंत्रिमंडळातील 43 पैकी 39 मंत्री विधानसभेचे सदस्य आहेत. या 39 पैकी 21 मंत्र्यांनी सत्तारुढ महाविकास आघाडीतील पक्षांचाच पराभव केला आहे. उद्धव यांच्या मंत्रिमंडळातील 14 मंत्र्यांनी शिवसेना उमेदवारांचा पराभव करुन विधानसभा गाठली. तर 12 मंत्र्यांनी भाजपा उमेदवारांना धूळ चारली आहे. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या 4 जणांनी राष्ट्रवादी, 3 मंत्र्यांनी काँग्रेस तर 6 मंत्र्यांनी अपक्ष उमेदवारांचा पराभव करुन विधानसभा निवडणूक जिंकली आहे. शिवसेना उमेदवारांना पराभूत करुन विधानसभा गाठणाऱ्या आणि त्यानंतर मंत्री झालेल्यांमध्ये बाळासाहेब थोरात (संगमनेर), के. सी. पाडवी (अक्कलकुवा), छगन भुजबळ (येवला), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा), अदिती तटकरे (श्रीवर्धन), राजेंद्र पाटील (शिरोळ), दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), विश्वजीत कदम (पलूस-कडेगाव), राजेश टोपे (घनसावंगी),  नवाब मलिक (अणुशक्तीनगर), वर्षा गायकवाड (धारावी), यशोमती ठाकूर (तिवसा), विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी), राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा) यांचा समावेश होतो. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झालेले आमदार 1) प्राजक्त तनपुरे (राहुरी)2) शंकरराव गडाख (नेवासा)3) अजित पवार (बारामती)4) दत्तात्रय भरणे (इंदापूर)5) अशोक चव्हाण (भोकर)6) धनंजय मुंडे (परळी)7) संजय बनसोडे (उदगीर)8) अमित देशमुख (लातूर शहर)9) अस्लम शेख (मालाड पश्चिम)10) अनिल देशमुख (काटोल)11) नितीन राऊत (नागपूर उत्तर)12) सुनील केदार (सावनेर)

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केलेले महाविकास आघाडी सरकारमधील 4 मंत्री1) उदय सामंत (रत्नागिरी)2) शंभूराज देसाई (पाटण)3) संदीपान भुमरे (पैठण)4) आदित्य ठाकरे (वरळी)

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव केलेले महाविकास आघाडी सरकारमधील 3 मंत्री1) दादाजी भुसे (मालेगाव बाह्य)2) एकनाथ शिंदे (कोपरी-पाचपाखडी)3) बच्चू कडू (अचलपूर)

विधानसभा निवडणुकीत अपक्षांचा पराभव केलेले महाविकास आघाडी सरकारमधील 6 मंत्री1) गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण)2) हसन मुश्रीफ (कागल)3) जयंत पाटील (इस्लामपूर)4) बाळासाहेब पाटील (कराड उत्तर)5) सत्तार अब्दुल (सिल्लोड)6) संजय राठोड (दिग्रस) 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस