शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा पराभव करून जिंकलेले १४ जण मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 05:21 IST

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात १४ असे मंत्री आहेत की जे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव करुन विधानसभेवर निवडून गेलेले आहेत.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात १४ असे मंत्री आहेत की जे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव करुन विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. १२ असे मंत्री आहेत की ज्यांनी भाजपचा पराभव केला होता.शिवसेनेचा पराभव केलेले मंत्री असे : बाळासाहेब थोरात (संगमनेर), के. सी. पाडवी (अक्कलकुवा), छगन भुजबळ (येवला), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), राजेश टोपे (घनसावंगी), नवाब मलिक (अणुशक्तीनगर), वर्षा गायकवाड (धारावी), यशोमती ठाकूर (तिवसा), विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी), डॉ.राजेंद्र शिंगणे (शिंदखेड राजा), अदिती तटकरे (श्रीवर्धन), राजेंद्र पाटील यड्रावकर (शिरोळ), विश्वजित कदम (पलूस-कडेगाव).एकूण ४३ मंत्र्यांपैकी ३९ हे विधानसभेचे सदस्य आहेत. त्यापैकी २१ मंत्र्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांचाच पराभव केलेला आहे. चार जणांनी राष्ट्रवादीचा, तिघांनी काँग्रेसचा तर सहा जणांनी अपक्ष उमेदवारांचा पराभव केला होता. भाजपचा पराभव करून जिंकलेले मंत्री असे : अजित पवार (बारामती), अशोक चव्हाण (भोकर), अनिल देशमुख (काटोल), नितीन राऊत (उत्तर नागपूर), सुनील केदार (सावनेर), धनंजय मुंडे (परळी), अमित देशमुख (लातूर), शंकरराव गडाख (नेवासा), अस्लम शेख (मालाड पश्चिम), दत्तात्रय भरणे (इंदापूर), संजय बनसोडे (उदगीर), प्राजक्त तनपुरे (राहुरी).विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव केलेले महाविकास आघाडीतील चार मंत्री असे : आदित्य ठाकरे (वरळी), उदय सामंत (रत्नागिरी), शंभूराज देसाई (पाटण), संदीपान भुमरे (पैठण). काँग्रेसचा पराभव करणाऱ्या तीन मंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे (कोपरी-पाचपाखडी), दादाजी भुसे (मालेगाव बाह्य), बच्चू कडू (अचलपूर) यांचा समावेश आहे.जयंत पाटील (इस्लामपूर), हसन मुश्रीफ (कागल), संजय राठोड (दिग्रस), गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), अब्दुल सत्तार (सिल्लोड) हे सहा मंत्री अपक्ष उमेदवारांचा पराभव करून विधानसभेत पोहोचले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना