शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

० ते १० पटसंख्या असलेल्या १३१४ शाळा पहिल्या टप्प्यात स्थलांतरीत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 19:44 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कोणत्याही प्रकारे कमी होऊ नये यासाठीच ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा नजिकच्या शाळांमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई  – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कोणत्याही प्रकारे कमी होऊ नये यासाठीच ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा नजिकच्या शाळांमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १३१४ शाळांपैकी एकही शाळा बंद करण्यात आलेली नाही व शाळांमधील एकाही शिक्षकाची नोकरी कमी करण्यात आली नाही, असे शिक्षणमंत्री  विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्यात येत नसून या शाळांमधील विदयार्थ्यांचे आणि शिक्षकांचे जवळच्याच शाळेत कशा पध्दतीने समायोजन करण्यात येईल यासंदर्भातील पत्रकार परिषद आज मंत्रालयात आयोजित केली होती. यावेळी शिक्षण मंत्री यांनी समायोजन करताना विदयार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याबरोबर विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच विदयार्थ्यांना देण्यात येणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे महत्वाचे असून शिक्षकांच्या नोकरी किंवा बदलीचा प्रश्न उदभवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. आज अशा अनेक शाळा डोंगराळ आणि दुर्गम भागात आहेत जेथे विदयार्थी संख्या ० असली तरी शाळा सुरु ठेवण्यात आल्या आहेत.

यावेळी तावडे म्हणाले की,  शिक्षण हकक्‍ कायदा, २००९ मध्ये २० हून कमी पटसंख्या असलेल्या शाळा तसेच १ किमी पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या शाळा बंद करता येते. ऑक्टोबर, २०११ मध्ये जवळपास २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जवळपास १२ हजार हून अधिक शाळा होत्या. डोंगराळ, दुर्गम आणि आदिवासी भागात १ किमी अंतर मोजताना वेगळे नियम लावले जातात.

गेल्या काही दिवसामध्ये राज्यभरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यातील ५००२ शाळांमध्ये १० पेक्षा कमी पटसंख्या दिसून आली. या ५००२ शाळांमधील ४३५३ शाळा जिल्हा परिषदेच्या तर ६९ शाळा खाजगी अनुदानित आहेत. या सर्व शाळांमधील विदयार्थ्यांना आणि शिक्षकांना जवळच्या शाळेत समायोजित केले जाणार असून याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

अनेक शाळा समायोजित करीत असताना ० ते १० मुलांची पटसंख्या असलेल्या ४४२२ शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले असून १३१४ शाळांचे स्थलांतरण जवळच्या शाळेत करण्यात येणार आहे. २०९७ शाळांतील मुलांचे स्थलांतरण करता येऊ शकेल परंतु त्यासाठी वाहन आवश्यक आहे असे लक्षात आले आहे. तर जवळपास ९०९ शाळा स्थलांतरित करता येणार नाही, असे लक्षात आल्याने या शाळा बंद करण्यात येणार नाही. यामध्ये गडचिरोली येथील १३७, चंद्रपूर मधील १६, सिंधुदुर्गमधील ३५, ठाणे ४४, रत्नागिरी येथील १२५, रायगड येथील १०७ आणि सातारा येथील १०७ शाळा आहेत. ज्यांचे स्थलांतर करण्यात येणार नाही, असेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले. कमी गुणवत्तेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ठेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान शालेय शिक्षण विभागाला करायचे नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आकडेवारी खालीलप्रमाणे.

·         कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील शाळांचा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला.

·         राज्यातील एकूण शाळांपैकी ५,००२ शाळांमधील मुलांची पटसंख्या ० ते १० या दरम्यान आहे.

·         यापैकी ४,३५३ शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत – (जिल्हा परिषद शाळांमध्ये ८०७२ शिक्षक आहेत.) आणि खाजगी अनुदानित शाळा ६९ आहेत – (खाजगी अनुदानित शाळांमध्ये २२० शिक्षक आहेत.) अशा एकूण ० ते १० पटसंख्या असलेल्या एकुण ४४२२ शाळा आहेत. उर्वरीत ५८० शाळा या आदिवासी, विना अनुदानित, सामाजिक न्याय, स्वयंअर्थसहाय्यित आदी प्रकारात मोडतात. त्यामुळे तुर्तास या ५८० शाळांचा विचार करण्यात आलेला नाही.

·         ४४२२ शाळामधून २८,४१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

·         २०९७ शाळांचे स्थलातर होऊ शकते, मात्र त्यांना वाहनांची सोय उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

·         सर्वेक्षण करण्यात आलेल्या शाळांपैकी ९०९ शाळांचे स्थलांतर होऊ शकत नाही.

 

१३१४ शाळांची विभागनुसार आकडेवारी खालीलप्रमाणे.

मुंबई विभागमुंबई उपनगर –१ठाणे ४५पालघर ३२रायगड १०३ नाशिक विभागजळगाव ८धुळे ७नंदुरबार ५नाशिक ३१ पुणे विभागपुणे ७६सोलापूर २१अहमदनगर ४९कोल्हापूर विभागकोल्हापूर ३४रत्नागिरी १९२सांगली १६सातारा ७३सिंधुदुर्ग १५५औरंगाबाद विभागऔरंगाबाद ४०जालना ६परभणी १४बीड २३हिंगोली ४ लातूर विभागलातूर ८उस्मानाबाद ७नांदेड ६८ अमरावती विभागअमरावती ४९अकोला १८वाशिम ९यवतमाळ ३०बुलढाणा ८ नागपूर विभागनागपूर २४वर्धा २९भंडारा १२गोंदिया ३२चंद्रपूर ५३गडचिरोली ४२

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे