शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे १३ हजार कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 11:33 IST

शुगर केन कंट्रोल अ‍ॅक्टनुसार शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम १४ दिवसांत देणे बंधनकारक आहे. अन्यथा कारखान्यांना १५ टक्के व्याजासह ही रक्कम द्यावी लागते.

ठळक मुद्देफेब्रुवारी अखेरची स्थिती : अजूनही पाच हजार कोटी रुपयांची थकबाकी 

पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये केलेली वाढ, साखर आयुक्तालयाने थकबाकीदार कारखान्यांवर सुरु केलेली कारवाई त्यामुळे कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी (एफआरपी) शेतकऱ्यांना १२ हजार ९४९ कोटी २८ लाख रुपयांची रक्कम अदा केली आहे. यातील पावणेआठ हजार कोटी रुपयांची रक्कम जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात देण्यात आली आहे. मात्र, अजूनही ४ हजार ८६४ कोटी ९७ लाख रुपये थकीत आहेत. शुगर केन कंट्रोल अ‍ॅक्टनुसार शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम १४ दिवसांत देणे बंधनकारक आहे. अन्यथा कारखान्यांना १५ टक्के व्याजासह ही रक्कम द्यावी लागते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला फारसा उठाव नसल्याने कारखान्यांना अपुरा दुरावा (शॉर्ट मार्जिन) निर्माण झाला होता. या पुर्वी साखरेची किमान आधारभूत किंमत २९०० रुपये प्रतिक्विंटल होती. त्यावर ९० टक्के कर्ज कारखान्यांना बँकांकडून उपलब्ध होत होते. केंद्र सरकारने दहा टक्के साखर उताऱ्यासाठी २७५० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. त्या पुढील प्रत्येक टक्क्यांसाठी २७५ रुपये देण्याचे जाहीर केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ११ टक्के आहे. त्यामुळे सरासरी ३ हजार रुपये एफआरपी होते. साखरेला नसलेला भाव, वाढलेला उत्पादन खर्च या मुळे सरासरी क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांची तूट येत होती. जानेवारी महिन्यात राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नव्हती. शेतकरी संघटनांनी त्या विरोधात आवाज उठविल्यानंतर साखर आयुक्तालयाने कारखान्यांवर रेव्हेन्यू रिकव्हरीचा बडगा उगारला. त्यामुळे कारखान्यांनी काही प्रमाणात एफआरपी देण्यास सुरुवात केली. दुसरीकडे केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत ३१०० रुपये केल्याने कारखान्यांना त्या प्रमाणात कजार्ची रक्कम अधिक मिळत आहे. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तब्बल ७ हजार ७८३ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यात यंदाच्या हंगामात १९३ साखर कारखाने सहभागी झाले आहेत. तर, १५ फेब्रुवारी पर्यंत राज्यात ७६२.०९ लाख टन उसाचे गाळप झाले. त्या गाळपानुसार फेब्रुवारी अखेरीस १७ हजार ८१४ कोटी २५ लाख रुपयांची एफआरपी होते. त्या पैकी सुमारे ७१ टक्के एफआारपी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. जवळपास ६५ कारखान्यांनी ८० टक्क्यांहून अधिक रक्कम अदा केली आहे. तर, ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिलेल्या कारखान्यांनी संख्या ७३ इतकी आहे. 

----------------------

१५ फेब्रुवारीच्या गाळपानुसार २८ फेब्रुवारी अखेरची एफआरपीची स्थिती

पूर्ण एफआरपी दिलेले कारखाने                  २३ ८० ते ९९ टक्के दिलेले कारखाने        ४२६० ते ७९ टक्के दिलेले            ५५४० ते ५९ टक्के दिलेले            ४४३९ टक्क्यांपेक्षा कमी दिलेले                  २२शून्य एफआरपी दिलेले            ७     जानेवारी-फेब्रुवारीत एफआरपीची दिलेली रक्कम                ७,७८३ कोटी 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारFarmerशेतकरी