शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

३ वर्षांत १२,६३१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्यभरात भीषण स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 2:36 AM

तीन महिन्यांत तब्बल ६१० आत्महत्या

मुंबई : राज्यात जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्यांत ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१५ ते २०१८ या कालावधीत १२ हजार ६३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती शुक्रवारी विधानसभेत लेखी उत्तरात देण्यात आली.राज्यभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात अजित पवार यांच्यासह अन्य सदस्यांनी लेखी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शेतकºयांनी केलेल्या आत्महत्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी लेखी उत्तरात माहिती दिली.२७ फेब्रुवारी २००६च्या शासन निर्णयानुसार मृत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्याबाबत चौकशीच्या काळात सदर व्यक्ती शेतकरी होता किंवा कसे याबाबतचे निकष सुधारण्यात आले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकºयाने शेतीसाठी, शेती सुधारण्यासाठी कर्ज घेतले होते किंवा कसे याबाबत निकष सुधारण्यात आले आहेत. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था व मान्यताप्राप्त सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास व या कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे कर्जाचे हप्ते प्रलंबित असल्यास संबंधित व्यक्तीला मदतीसाठी पात्र ठरवण्यात येते, अशी माहिती या वेळी देण्यात आली.केवळ १९६ कुटुंबीय मदतीस पात्र२०१५ ते २०१८ कालावधीत १२ हजार ०२१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ६ हजार ८८८ आत्महत्यांची प्रकरणे निकषात बसत होती. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तर जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी केवळ १९६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी निकषाप्रमाणे आर्थिक मदतीसाठी पात्र ठरवण्यात आली आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या