शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

१२६ कोटी केव्हा मिळणार?

By admin | Updated: February 10, 2015 00:48 IST

वर्षभरापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळे नादुरुस्त झालेल्या जिल्ह्यातील ८०३ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सरकारकडे १५८ कोटींची मागणी केली होती. परंतु ३२ कोटी मिळाले.

रस्त्यांची दुरुस्ती रखडली : बांधकाम समिती सदस्यांचा प्रश्न नागपूर : वर्षभरापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळे नादुरुस्त झालेल्या जिल्ह्यातील ८०३ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सरकारकडे १५८ कोटींची मागणी केली होती. परंतु ३२ कोटी मिळाले. यातून जेमतेम ४५ रस्त्यांची कामे झालेली आहेत. उर्वरित १२६ कोटी केव्हा मिळणार असा प्रश्न सोमवारी बांधकाम समितीच्या बैठकीत माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्यासह सदस्यांनी उपस्थित केला.२०१३-१४ या वर्षात रस्ते दुरुस्तीसाठी ३२ कोटींचा निधी मिळाला. यातून ४५ कामे पूर्ण करण्यात आली. १५२ कामे सुरू आहेत परंतु उर्वरित ६०५ कामे रखडलेली आहेत. पुढील पावसाळ्यापर्यंत ती दुरुस्त होण्याची शक्यता नाही. रस्ते नादुरुस्त असल्याने ग्रामीण भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकांना त्रास होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. १० कोटी ४० लाखांच्या निविदा स्वीकृत करण्यात आल्या आहेत. या कामाचे कार्यादेश देण्यात आले. यात रस्ते बांधकाम व दुरुस्ती, तीर्थक्षेत्र विकास, अंगणवाडी बांधकाम व आरोग्य विभागाच्या कामांचा समावेश असल्याची माहिती उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी दिली. जि.प.मार्फत करण्यात येणाऱ्या कामाच्या निविदा काढण्याला विलंब लागतो. यासाठी अल्पमुदतीच्या निविदा काढण्याची शासनाने अनुमती द्यावी, असा प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी केली. सदस्य दुर्गावती सरियाम, कमलाकर मेंघर, अंबादास उके, नंदा नारनवरे, शांताराम मडावी उपस्थित होते.(प्रतिनिधी)आराखड्यात कामांचा समावेश करारस्ते विकास आराखडा २००१-२१ मध्ये जि.प.सर्कलमधील अनेक रस्त्यांचा समावेश नाही. ते समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. ४० कोटींची मागणीरस्ते दुरुस्तीसाठी बांधकाम समितीने ग्राम विकास विभागाकडे ४० कोटीची मागणी केली आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर यातून रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहे.