शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राज्यात १.२० लाख रोजगार, ४० हजार कोटींची गुंतवणूक : पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे विशाल प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 11:59 IST

Maharashtra: राज्यात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असलेल्या आणि १ लाख २० हजार रोजगार निर्माण करणार असलेल्या विशाल प्रकल्पांच्या उभारणीला बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

मुंबई :  राज्यात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असलेल्या आणि १ लाख २० हजार रोजगार निर्माण करणार असलेल्या विशाल प्रकल्पांच्या उभारणीला बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या उपस्थितीत ‘सह्याद्री अतिथीगृहा’वर ही बैठक झाली. बैठकीस वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.  

ईव्ही असणाऱ्यांचा फायदाnपुणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई या भागांत ४० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रकल्प उभारले जातील. nत्यात पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे देशातील पहिल्या सुमारे १२ हजार ४८२ कोटींच्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरी निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. 

नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क जेम्स अँड ज्वेलरी आर्ट प्रमोशन कौन्सिलद्वारे  महापे; नवी मुंबई येथे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क २१ एकर जागेवर उभारला जाईल. त्या ठिकाणी १३५३ औद्योगिक व व्यापारी आस्थापना सुरू होतील. या ठिकाणी २० हजार कोटींची गुंतवणूक व एक लाख प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल. या प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे.

कुठे कोणते प्रकल्प? पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे गोगोरो इंडिया प्रा.लि. कंपनीमार्फत इलेक्ट्रिक व्हेईकल व बॅटरी निर्मिती, तसेच स्वॅपिंग स्टेशनसाठीच्या पायाभूत सुविधांची उभारणी. हा देशातील असा पहिलाच प्रकल्प असेल. गोगोरो राज्यभरात सुमारे १२ हजार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स स्थापन करणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रिक व्हेईकल्स व बॅटरीची निर्मिती करणारी एथर एनर्जी कंपनी ८६५ कोटींच्या गुंतवणुकीतून प्रकल्प उभारेल. एथर एनर्जी ही भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन कंपनी आहे. जी प्रगत आणि कनेक्टेड इलेक्ट्रिक दुचाकी बनविते. पुणे येथे देशातील पहिल्या ई-बसनिर्मितीच्या ७७६ कोटी गुंतवणुकीच्या पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स प्रा.लि.च्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली. तेथे इलेक्ट्रिक आणि  हायड्रोजन इंधन वाहननिर्मिती सुविधा उभारण्यात येणार आहे. रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीचा २७०० कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प, रायगड येथेच २०३३ कोटी गुंतवणुकीच्या स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज कंपनीचा प्रकल्प, नंदुरबार येथे  जनरल पॉलिफिल्म्स कंपनीचा ५०० कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प, सातारा येथे विप्रो परी रोबोटिक्स कंपनीचा ५४४ कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प, अहमदनगर येथे  ११० कोटी गुंतवणुकीचा गणराज इस्पात कंपनीचा प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रInvestmentगुंतवणूकMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार