शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अध्यक्षपद निवडणुकीत १२ आमदार अनुपस्थित; 'मविआ'चे सर्वात जास्त सदस्य गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 09:11 IST

एमआयएमचे धुळे शहरचे फारुक शहा, समाजवादी पार्टीचे अबू आझमी आणि रईस शेख हे तीन आमदार मतदानावेळी तटस्थ राहिले, तर एकूण १२ आमदार या निवडणुकीला अनुपस्थित राहिले

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत तीन आमदार सभागृहात तटस्थ, तर १२ आमदार अनुपस्थित राहिले. निवडणूक एकतर्फी झाल्याने सर्व २८७ आमदारांनी मतदान केले असते तरी राहुल नार्वेकरच विजयी झाले असते, हे त्यांना मिळालेल्या १६४ मतांवरून स्पष्ट होते.

एमआयएमचे धुळे शहरचे फारुक शहा, समाजवादी पार्टीचे अबू आझमी आणि रईस शेख हे तीन आमदार मतदानावेळी तटस्थ राहिले, तर एकूण १२ आमदार या निवडणुकीला अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, भाजप-काँग्रेसचे प्रत्येकी २ आणि एमआयएमचा १ यांचा यात समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे ते मतदानाला हजर राहू शकले नाहीत, तर नीलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, बबन शिंदे, अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे, तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर हे अनुपस्थित राहिल्याने या मतांचा फटका राजन साळवी यांना बसला. मालेगाव मतदारसंघाचे एमआयएमचे आमदार इस्माईल कास्मी हेही गैरहजर होते.

आजारी असूनही राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीला उपस्थित राहिलेले भाजप आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक हे विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळी मात्र गैरहजर होते. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची दोन मते कमी झाली. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे, तर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना नियमानुसार मतदान प्रक्रियेत सहभागी होता येत नसल्याने त्यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही.

नीलेश लंके यांनी दिले आजारपणाचे कारणराष्ट्रवादी काँग्रेस पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी दिले आजारपणाचे कारण दिले. मालेगाव मध्य मतदार संघातील एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद गैरहजर राहिले.  आमदार बबनराव शिंदे हे परदेशातून मुंबईत परतत असल्याने ते मतदानासाठी सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत, तर आमदार प्रणिती शिंदे या घरगुती कार्यक्रमात सहभागी असल्याने सहभागी होऊ शकल्या नाहीत, अशी कारणे सांगण्यात आली. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाRahul Narvekarराहुल नार्वेकर