शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‎११ जहाल माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण, महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र, ८२ लाखांचे होते इनाम ‎ ‎ ‎

By संजय तिपाले | Updated: December 10, 2025 12:37 IST

Gadchiroli News: दंडकारण्यातील माओवादी चळवळीला सुरक्षा यंत्रणेने १० डिसेंबर रोजी आणखी एक हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत  तब्बल ११ वरिष्ठ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य, प्लाटून कमिटी सदस्य, एरिया कमिटी सदस्य अशी उच्च पदावरील नक्षल्यांचा समावेश आहे.

गडचिरोली - दंडकारण्यातील माओवादी चळवळीला सुरक्षा यंत्रणेने १० डिसेंबर रोजी आणखी एक हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत  तब्बल ११ वरिष्ठ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य, प्लाटून कमिटी सदस्य, एरिया कमिटी सदस्य अशी उच्च पदावरील नक्षल्यांचा समावेश असून, सर्वांवर मिळून ८२ लाखांची बक्षिसे  होती.

यापैकी चार माओवादी शस्त्रांसह आणि पूर्ण गणवेशात उपस्थित राहिल्याने कार्यक्रमात कडेकोट सुरक्षा पाहायला मिळाली. या आत्मसमर्पणामुळे दंडकारण्यात माओवादी संघटनेला जबरदस्त धक्का बसला असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. कार्यक्रमास अपर  महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा,‎पोलिस अधीक्षक नीलोत्पल, ‎अपर अधीक्षक एम. रमेश, साईकार्तिक, अनिकेत हिरडे तसेच अभियानात सहभागी अधिकारी–जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण ‎रमेश उर्फ भीमा उर्फ बाजू लेकामी (डिव्हीसीएम), ‎भीमा उर्फ सितू उर्फ किरण हिडमा कोवासी (डिव्हीसीएम), पोरीये उर्फ लक्की अडमा गोटा (पीपीसीएम), रतन उर्फ सन्ना मासु ओयाम (पीपीसीएम),कमला उर्फ रागो इरिया वेलादी (पीपीसीएम), पोरीये उर्फ कुमारी भीमा वेलादी (एसीएम), रामजी उर्फ मुरा लच्छु पुंगाटी (एसीएम), सोनू पोडीयाम उर्फ अजय, प्रकाश उर्फ पांडू पुंगाटी, सीता उर्फ जैनी तोंदे पल्लो, साईनाथ शंकर मडे (AOB दलम) यांचा समावेश आहे.

भूपतीच्या आत्मसमर्पणानंतरची सर्वात मोठी कारवाई‎१५ ऑक्टोबर २०२५ रोजी माओवादी चळवळीतील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी भूपती उर्फ सोनू मल्लोजुला वेनुगोपाल राव याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६१ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले होते. तो धक्का अजूनही ताजा असतानाच आजचे सामूहिक आत्मसमर्पण माओवादी संघटनेसाठी आणखी मोठा हादरा ठरत आहे.

‎सी–६० चे कौतुक, जवानांचा सत्कार‎एकलव्य हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमहासंचालक रश्मी शुक्ला यांनी सी–६० पथकाच्या धाडसी कामगिरीचे भरभरून कौतुक केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी–जवानांना त्यांनी प्रशस्तिपत्र देऊन गौरविले. ‎त्या म्हणाल्या, दंडकारण्यात हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येणे ही माजी माओवाद्यांसाठी नवी सुरुवात आहे. उर्वरित नक्षल्यांनीही शस्त्रे खाली ठेवून शांततेचा मार्ग स्वीकारावा.

‎‘प्रोजेक्ट उडान’चे अनावरण, विकासाचा नवा वेधगडचिरोली पोलिसांनी दुर्गम भागातील नागरिकांसाठी तयार केलेल्या ‘प्रोजेक्ट उडान – वेध विकासाचा’ या मार्गदर्शक पुस्तकाचे अनावरणही महासंचालक शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाद्वारे सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 11 Maoists Surrender with Weapons in Gadchiroli, a Major Blow

Web Summary : In Gadchiroli, 11 high-ranking Maoists surrendered with weapons before DGP Rashmi Shukla. These rebels, carrying a total bounty of ₹82 lakh, included divisional and platoon committee members. This surrender marks a significant setback for the Maoist movement in Dandakaranya, following a previous major surrender in 2025.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस