शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यासाठी १,०७० ‘ई-पॉस’ उपलब्ध

By admin | Updated: April 7, 2017 00:22 IST

अकोला- विभागातील पाचही जिल्ह्यात रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यासाठी १,०७० मशीन बुधवारी उपलब्ध झाल्या.

संतोष येलकर - अकोलासार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरित करण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांसाठी १ हजार ७० ‘ई-पॉस’ मशीन बुधवारी उपलब्ध झाल्या.सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत दरमहा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना दरमहा धान्य वितरित करण्यात येते. राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने धान्य वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यासाठी गत वर्षभरात शिधापत्रिका क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरित करण्यासाठी रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विभागातील अमरावती व वाशिम जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन लावण्यात आल्या आहेत, तर अकोला जिल्ह्यातील १ हजार ५० रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन लावण्यासाठी १ हजार ७० ई-पॉस मशीन संबंधित कंपनीकडून प्राप्त झाल्या आहेत. उपलब्ध झालेल्या ई-पॉस मशीन पुढील आठवड्यात अकोला जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमध्ये लावण्यात येणार असून, या मशीनद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. बायोमेट्रिक पद्धतीने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील १ हजार ५० रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्यात येणार आहेत. त्याकरिता १ हजार ७० ई-पॉस मशीन उपलब्ध झाल्या आहेत. उपलब्ध झालेल्या मशीन रास्त भाव दुकानांमध्ये लावण्याचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे.-अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी