शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

राज्यात अतिवृष्टीचे १०४ बळी; २७५ गावांतील जनजीवन विस्कळीत, ७३ ठिकाणी निवारा केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 05:57 IST

राज्यात १ जून २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४९९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  

मुंबई : यंदाच्या मोसमात आतापर्यंत पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १०४ जणांचा बळी गेला. आतापर्यंत २७५ गावांतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत सरासरी ४९९ मिमी पावसाची नोंद झाली असून चोवीस तासांत सरासरी ८.३ मिमी पाऊस झाला.

राज्यात १ जून २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४९९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या अतिवृष्टीमुळे राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, वाशिम, यवतमाळ, धुळे, नागपूर, पालघर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग अशा एकूण २३ जिल्ह्यांना फटका बसला. राज्यभरातील ४४ घरांचे नुकसान झाले असून १३६८ घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. राज्यभरात ७३ ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आली असून पूरपरिस्थितीतून  ११ हजार ८३६ जणांना वाचविण्यात यश आले आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. गेल्या चोवीस तासांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून दोन गावांना त्यांचा फटका बसला आहे. तर ३ जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे नागपूर विभागात सर्वाधिक मृत्यू झाले. यात नागपूर १५, वर्धा  ४, भंडारा २, गोंदिया ६ आणि गडचिरोली येथील ५ अशा ३२ जणांचा समावेश आहे. नाशिक विभागात नाशिकमधील १३, नंदुरबार येथे ३, धुळे येथे २ जळगाव येथे ४ आणि नगर येथील ३ जणांचा मृत्यू झाला.

धोक्याची पातळी ओलांडली 

- गडचिरोली येथे २४ तासांत २०.०० मिमी पाऊस पडला असून येथील वैनगंगा, प्राणहिता आणि वर्धा नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत.

- गोदावरी आणि इंद्रावती या नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. 

- त्यामुळे येथील १० हजार ६०६ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्र उघडण्यात आले आहेत.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र