डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दलित वस्तीत 100 टक्के विद्युतीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 19:31 IST2018-04-11T19:31:30+5:302018-04-11T19:31:30+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्ययोजनेतून राज्यातील ज्या 192 गावात  80 टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावात 100 टक्के  विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

100% electrification of Dalit residents on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दलित वस्तीत 100 टक्के विद्युतीकरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दलित वस्तीत 100 टक्के विद्युतीकरण

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्ययोजनेतून राज्यातील ज्या 192 गावात  80 टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावात 100 टक्के  विद्युतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबीर लावण्यात येणार असून या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. ज्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आलेला आहे, अशा ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरली तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उदिष्ट्य असून  ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि. 14 एप्रिल ते 05 मे 2018 या दरम्यान संपूर्ण राज्यात ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये राज्यातील ज्या गावात दलितांची संख्या 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे व गरीब कुटुंबांचे प्रमाणही जास्त आहे अशा गावात सौभाग्य योजनेतून वीज नसलेल्या सर्व कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. 

या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी अशा सर्व 192 गावात मोठया संख्येत शिबीर लावण्यात येणार आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. सौभाग्य योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे

Web Title: 100% electrification of Dalit residents on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti