शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शंभर टक्के एफआरपी देणाऱ्यांना गाळप परवान्यात प्राधान्य : साखर आयुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 13:31 IST

गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊस क्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरुन ८.२३ लाख हेक्टर पर्यंत घट झाली आहे. ..

ठळक मुद्देपरवाना वितरणाबाबत निकष ठरविणारलांबलेल्या पावसामुळे जून महिन्यात जिल्ह्यासह विविध ठिकाणी चारा छावण्या सुरु सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानराज्यात पूरस्थितीपूर्वी ५७० लाख टन ऊस गाळपातून ६३ लाख टन साखर उत्पादित होईल ऊस नुकसानीचा अंदाज येण्यास सात दिवस लागतील

पुणे : आगामी गाळप हंगामासाठी उसाची रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) शंभर टक्के रक्कम दिलेल्या साखर कारखान्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आगामी हंगामासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून, परवाना देताना या बाबी पाहिल्या जातील, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. आगामी गाळप हंगाम येत्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होईल. त्यापूर्वी परवाने देण्याची प्रक्रिया साखर आयुक्तालयाने सुरु केली आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊस क्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरुन ८.२३ लाख हेक्टर पर्यंत घट झाली आहे. तसेच, लांबलेल्या पावसामुळे जून महिन्यात जिल्ह्यासह विविध ठिकाणी चारा छावण्या सुरु होत्या. त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ऊस गेला. त्यानंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तेथील नुकसानीचा नेमका आकडा हाती येण्यास अजूनही पाच ते सात दिवस लागतील, असे साखर आयुक्त म्हणाले. राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीपूर्वी ५७० लाख टन ऊस गाळपातून ६३ लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला होता. पुरामुळे गाळपासाठी आणखी कमी ऊस उपलब्ध होईल. त्यामुळे साखरेसह मळी, इथेनॉल, ब गॅस आणि कोजनचे उत्पादनही निम्म्याने घटेल असा अंदाज आहे. दरवर्षी साधारण ४४ ते ४५ लाख टन मळीचे उत्पादन होते. यंदा त्यात २० लाख टनापर्यंत घट होईल, असा अंदाज आहे.  याबाबत माहिती देताना साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, आगामी गाळप हंगामासाठी दीड-दोन महिन्याचा कालावधी असला तरी परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. परवाना देताना ज्यांनी व्याजासह शंभरटक्के एफआरपी दिली त्यांचा प्राधान्याने विचार होईल. त्यानंतर शभंरटक्के एफआरपी दिलेल्या कारखान्यांना परवाना दिला जाईल. एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांच्या परवाना वितरणाचे निकष ठरविण्यात येतील. --------------------ऊस नुकसानीचा अंदाज येण्यास सात दिवस लागतीलसांगली आणि कोल्हापूरला उसाचे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज येण्यास अजूनही पाच ते सात दिवस लागतील. पुढील आठवड्यात साखर कारखान्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.  

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारFarmerशेतकरीfloodपूर