एसटी कर्मचार्यांना १० टक्के महागाई भत्ता
By Admin | Updated: May 30, 2014 02:13 IST2014-05-30T02:13:02+5:302014-05-30T02:13:02+5:30
आर्थिक संकटात असतानाही एसटीच्या कर्मचार्यांना १० टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार असून तो मे २0१४ च्या पगारापासून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले

एसटी कर्मचार्यांना १० टक्के महागाई भत्ता
मुंबई : आर्थिक संकटात असतानाही एसटीच्या कर्मचार्यांना १० टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार असून तो मे २0१४ च्या पगारापासून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. एसटीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही.एन. मोरे यांनी हा निर्णय घेतला. या वाढीव महागाई भत्त्याचा फायदा एसटीच्या १ लाख १0 हजार कर्मचार्यांना होणार आहे. मात्र, यामुळे महामंडळावर महिन्याला १० कोटी रुपये असा वर्षाला १२0 कोटी रुपयांचा भार पडेल. महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी ते एप्रिल २0१४ या कालावधीच्या वाढीव महागाई भत्त्याबाबत राज्य शासनाच्या निर्णयानंतर यथावकाश निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले की, या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. या निर्णयामुळे जेवढा पगार तेवढ्याच प्रमाणात महागाई भत्ता मिळणार आहे. (प्रतिनिधी)