शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगासाठी १० टक्के जादा तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 18:07 IST

नेहमीप्रमाणे साध्या यंत्रमागाकडे डोळेझाक केली असून सूतगिरण्यांना मदतीचा हात दिला

इचलकरंजी : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगासाठी गतवर्षीपेक्षा या वर्षी १० टक्के जादा तरतूद करण्यात आली आहे. यंत्रमाग उद्योगाच्या वीजसवलतीसह वस्त्रोद्योगातील विविध घटकांसाठी तरतूद करण्यात आली आहे. कोणती नवीन घोषणा अथवा मोठे दिलासादायक चित्र या वर्षीच्या अर्थसंकल्पात नाही.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सूतगिरण्या, यंत्रमाग उद्योग आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित लघु व मध्यम उद्योग कार्यरत आहेत. मात्र त्यांना मागील वर्षासारखीच तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वीजदर, उत्पादन खर्च तसेच जागतिक बाजारातील स्पर्धा यांमुळे उद्योगावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळेल असे वाटत होते; मात्र मागील पानावरून पुढे असेच राज्य सरकारने वस्त्रोद्योग धोरणात केले. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या वस्त्रोद्योगाला फारसा दिलासा मिळालेला नाही. नेहमीप्रमाणे साध्या यंत्रमागाकडे डोळेझाक केली असून सूतगिरण्यांना मदतीचा हात दिला आहे; त्यामुळे सूतगिरण्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

वस्त्रोद्योगातील प्रमुख आर्थिक तरतुदी (कोटींत) पुढीलप्रमाणे :

  • खुल्या प्रवर्गातील सहकारी सूतगिरण्यांचे भाग भांडवल – ६५.६९
  • सहकारी सूतगिरण्यांना १२ टक्के व्याज योजना – १५०.०९
  • यंत्रमाग संस्थांना भाग भांडवल – २०
  • यंत्रमाग संस्थांना कर्ज – २५
  • वस्त्रोद्योग प्रकल्पांना भांडवली अनुदान – १२५
  • वस्त्रोद्योग प्रकल्पांसाठी भांडवली अनुदान – २८०
  • वस्त्रोद्योग संकुल उभारणी – ४
  • तंत्रज्ञान उन्नती निधी योजनाअंतर्गत व्याज – ४०
  • यंत्रमाग घटकांना वीजसवलत – ९६३
  • इतर घटकांना वीजसवलत – ६५०
English
हिंदी सारांश
Web Title : Textile sector gets 10% budget boost, but relief is limited.

Web Summary : Maharashtra's budget allocates 10% more to textiles, including power subsidies for power looms. However, no major new announcements address rising costs and competition, leaving the industry facing continued financial pressure. Sutgirnis get some relief, while power looms are neglected.