शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीला जाण्यासाठी पत्नीनं हट्ट धरला, त्यानंही सुट्टी घेतली; पण रस्त्यातच काळानं घाला घातला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 00:00 IST

या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे.

अंबरनाथ : मोरीवली येथून काल रात्री शिर्डीला निघालेल्या भाविकांच्या एका बसला पहाटेच्या सुमारास, नाशिक जिल्यातील घोटी सिन्नर महामार्गावर असलेल्या पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे.

अंबरनाथ जवळील मोरीवली येथील काही रहिवासी गुरुवारी रात्रीच्या सुमारास, एकूण 15 बसेसनी शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. यातीलच एका बसला घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ अपघात झाला. या अपघातात मोरीवलीतील बारस्कर आणि उबाळे कुटुंबांवर काळाने घाला घातला. या अपघातात या दोन्ही कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

पत्नीचा हट्ट अन् काळाचा घाला - नरेश उबाळे यांच्या पत्नी वैशाली यांना शिर्डी येथे देवदर्शनाला जाण्यासाठी पासेस मिळाले होते. यानंतर त्यांनी पती नरेश यांच्याकडे साईबाबांच्या दर्शनाला जाण्यासाठी हट्ट धरला होता. यावर नरेश यांनी पत्नीच्या हट्टामुळे सुट्टी घेतली आणि ते पत्नी वैशाली, मुलगी निधी व मधुरा यांच्यासह शिर्डीला निघाले. मात्र, या प्रवासादरम्यान बसला झालेल्या भीषण अपघातात नरेश उबाळे आणि त्यांची पत्नी वैशाली उबाळे यांचा मृत्यू झाला. तर 9 वर्षीय निधी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नरेश हे एका वाईन शॉपमध्ये नोकरी करत होते. त्यांना 3 मोठे भाऊ असून त्यांच्या घरातील एकूण 17 जण देवदर्शनासाठी गेले होते. 

बारस्कर कुटूंबातील दोन जणांचा मृत्यूयाशिवाय, सुहास बारस्कर त्यांची पत्नी आणि दोन मुलीही याच याच बसमध्ये होत्या. या अपघातात बारस्कर यांच्या पत्नी श्रद्धा आणि मुलगी श्रावणी यांचा मृत्यू झाला आहे. तर सुहास आणि मोठी कन्या शिवन्या हे सुदैवाने बचावले आहेत. 

याच बरोबर, मोरीवली गावातील महालक्ष्मी पॅकेजिंग कंपनीचे मालक गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी आणि परिचयातील व्यक्तींना शिर्डी येथे देवदर्शनासाठी मोफत घेऊन जातात, असे स्थानिकांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Accidentअपघातshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाambernathअंबरनाथ