Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:27 IST2025-09-25T12:26:07+5:302025-09-25T12:27:10+5:30
मध्य प्रदेशातील खंडवा शहरातून एक अत्यंत भयानक आणि मानवतेला लाजवणारी घटना उघडकीस आली.

AI Image
मध्य प्रदेशातील खंडवा शहरातून एक अत्यंत भयानक आणि मानवतेला लाजवणारी घटना उघडकीस आली आहे. खंडवा येथील मोठ्या स्मशानभूमीत महिलांच्या कबरी खोदून त्यांच्या मृतदेहांशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आले, ज्यामुळे परिसरात आणि मुस्लिम समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कबरीतही महिला सुरक्षित नाही का? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला.
दोन दिवसांपूर्वी, ज्या महिलांना स्मशानभूमीत दफन करण्यात आले, त्यांच्या कुटुंबियांनी प्रार्थना करण्यासाठी कबरींना भेट दिली, तेव्हा कबरी उघड्या अवस्थेत पाहून त्यांना धक्का बसला. आजूबाजूला पाहिल्यावर त्यांना आणखी एका नवीन कबरीची अशीच अवस्था झाल्याचे दिसले. या घटनेने संतप्त झालेल्या कुटुंबाने तत्काळ शहर काझी, स्मशानभूमी व्यवस्थापन समिती आणि पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या सर्वांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक प्रकार उघड
तीन महिन्यांपूर्वीही अशीच घटना घडल्यामुळे स्मशानभूमी व्यवस्थापन समितीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता अत्यंत धक्कादायक दृश्य समोर आले. घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती नग्न अवस्थेत एका कबरीकडे जाताना दिसला. दिवसाच्या फुटेजमध्येही एक संशयास्पद तरुण कबरीजवळ रेकी करताना दिसला.
आरोपीला अटक
सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. फुटेजमधील वर्णनाशी जुळणाऱ्या एका व्यक्तीची माहिती जवार पोलिस स्टेशनकडून मिळाली. ५० वर्षीय अय्युब खान नावाच्या व्यक्तीला काल रात्री उशिरा हरसूदजवळ अटक करण्यात आली. अय्युब हा मुंडवारा गावातील रहिवाशी आहे, तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी व खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अय्युबची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
कारण काय?
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने मे महिन्यात खंडवा आणि सिहारा येथील स्मशानभूमीत महिलेच्या दोन नवीन कबरी खोदल्या होत्या आणि २१ सप्टेंबरच्या रात्री त्याने तिसरी घटना घडवली. धक्कादायक बाब म्हणजे, तुरुंगातील एका व्यक्तीने त्याला तांत्रिक विधी करण्यासाठी प्रवृत्त केले होते, ज्यामुळे त्याने हे भयानक गुन्हे केले.
पोलीस काय म्हणाले?
एसपी मनोज कुमार राय यांनी सांगितले की, "अय्युब खानविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येत आहे." या घटनेने धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत आणि समाजातील विकृत मानसिकतेवर गंभीर प्रश्न उभे केले जात आहेत.