शिवराजसिंह चौहान यांचे पुढे काय? सत्तेबाहेर जाण्याने राजकारणातील समर्थक नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:23 AM2023-12-13T10:23:08+5:302023-12-13T10:24:09+5:30

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक काळ राहिलेले शिवराजसिंह चौहान यांच्या सत्तेबाहेर जाण्याने राजकारणातील आणि इतरही क्षेत्रांतील त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत.

What next for Shivraj Singh Chauhan? His supporters in politics are upset with him going out of power | शिवराजसिंह चौहान यांचे पुढे काय? सत्तेबाहेर जाण्याने राजकारणातील समर्थक नाराज

शिवराजसिंह चौहान यांचे पुढे काय? सत्तेबाहेर जाण्याने राजकारणातील समर्थक नाराज

अभिलाष खांडेकर

भोपाळ : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक काळ राहिलेले शिवराजसिंह चौहान यांच्या सत्तेबाहेर जाण्याने राजकारणातील आणि इतरही क्षेत्रांतील त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत.

अनेक महिलांचे भैया आणि मामा असलेले शिवराजसिंह चौहान यांना वगळल्यामुळे अनेक महिला अक्षरश: रडत असल्याचे व्हिडीओ फिरत आहेत. या महिलांना राजकारण कळत नसेल; पण धूर्त राजकारणी फिनिक्सप्रमाणे उदयास येऊ शकतात, असे विधान त्यांनी काही आठवड्यांपूर्वी केले होते. ते खरोखरच दिल्लीमध्ये समाविष्ट केले जातील का? भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे संभाव्य पंतप्रधान म्हणून पाहत होते, त्या नेत्याचे पुढे काय होणार?

राजकीय वर्तुळात त्यांच्या भवितव्याबाबत अनेकदा चर्चा झडत असतात. अखेर त्यांनी प्रदीर्घ काळ राज्याचे नेतृत्व केलेले आहे. तथापि, नवीन मुख्यमंत्री म्हणून तुलनेने कमी अनुभवी आमदार व उपमुख्यमंत्र्यांची केलेली निवड, ही बाब केंद्रीय नेतृत्वाचे त्यांच्याबाबतचे धोरण स्पष्ट करणारी आहे.

मध्यप्रदेश भाजपमधील अनेकांना चौहान यांचा उत्तराधिकारी जाहीर करेपर्यंत काहीही माहिती नव्हते. त्यांना वाटते की, चौहान यांच्यासाठी सर्व काही संपले आहे. काही नेत्यांनी निदर्शनास आणून दिले आहे की, चौहान यांनी १६३ जागांसह विजय मिळवताना मतांचे प्रमाणही वाढवले आहे. तरीही त्यांना ३ डिसेंबर रोजी भाजप कार्यालयात जाऊ दिले नव्हते, तसेच त्यांना त्या दिवशी विजयी रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.

लाडली बहना योजना गेम चेंजर नव्हती...

  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले नव्हते.

   त्यांच्या विरोधी गटातील एका ज्येष्ठ मंत्र्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले की, आम्हाला असेही सांगण्यात आले होते की, अनेक बाबींमध्ये चौहान यांच्या कुटुंबीयांच्या सहभागाची माहिती आहे.

  त्यांची लाडली बहना ही योजना गेम

चेंजर नव्हती, असेही भाजपला अधिकृतपणे वाटत नाही.

Web Title: What next for Shivraj Singh Chauhan? His supporters in politics are upset with him going out of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.