शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

युनियन कार्बाइड कचरा : दोन आंदोलकांचे आत्मदहन'; पिथपुरम येथे पुकारले बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:16 IST

दोघे ४० वर्षे वयाचे असून, त्यांना पिथमपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना नंतर इंदूरमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळला आहे असे धारचे पोलिस अधीक्षक मनोज सिंग यांनी सांगितले. पिथमपुर बचाव समितीने पुकारलेल्या बंदमुळे शुक्रवारी शहरातील दुकाने आणि बाजारपेठा बंद राहिल्या. 

धार : युनियन कार्बाइडच्या ३३७ टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या मुद्यावरून मध्य प्रदेशातील पिथमपूर येथे पुकारलेल्या बंददरम्यान शुक्रवारी दोन व्यक्तींनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांना इंदूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन जणांनी अंगावर काही द्रवपदार्थ ओतून स्वतःला पेटवून घेतल्याचे काही व्हिडीओ, तसेच प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती यातून उघड झाले होते.

दोघे ४० वर्षे वयाचे असून, त्यांना पिथमपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना नंतर इंदूरमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळला आहे असे धारचे पोलिस अधीक्षक मनोज सिंग यांनी सांगितले. पिथमपुर बचाव समितीने पुकारलेल्या बंदमुळे शुक्रवारी शहरातील दुकाने आणि बाजारपेठा बंद राहिल्या. या समितीने दावा केला की, युनियन कार्बाइडच्या कचऱ्याची विल्हेवाट लावल्यामुळे स्थानिक रहिवासी व पर्यावरणावर घातक परिणाम होऊ शकतो. पिथमपुरची लोकसंख्या १.७५ लाख आहे आणि तेथील औद्योगिक क्षेत्रात शेकडो कारखाने आहेत. १९८४ मध्ये २ डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन कार्बाइडच्या भोपाळ येथील कारखान्यातून मिथाइल आयसोसायनेटची (एमआयसी) गळती होऊन किमान ५,४७९ लोकांचा मृत्यू झाला, तसेच त्यामुळे हजारो लोक गंभीर आजारांनी ग्रस्त झाले.

भोपाळमधून ३३७ टन कचरा पिथमपुर येथे शास्त्रीय विल्हेवाट लावण्यासाठी हलवण्यात आला आहे; पण या निर्णयामुळे मध्य प्रदेशात तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. काही आंदोलकांनी इशर मोटर्सजवळ रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सौम्य लाठीमार करून निदर्शकांना पांगविले. 

कचऱ्याच्या मुद्द्यावरून राजकारण करू नका-  गेल्या ३ डिसेंबरला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने युनियन कार्बाइड येथील कचरा न हटविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. गेली ४० वर्षे पडून असलेला हा कचरा युनियन कार्बाईड कंपनीच्या जागेतून चार आठवड्यांत हलवावा असा आदेश न्यायालयाने दिला. -  या कचऱ्याच्या मुद्द्यावरून कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केले. या कचऱ्यामध्ये ६० टक्के माती, ४० टक्के नाफ्था असून त्यामुळे कोणतेही हानिकारक परिणाम होणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agitationआंदोलनfireआगhospitalहॉस्पिटल