मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, पाहा कोण-कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 18:54 IST2023-10-27T18:53:48+5:302023-10-27T18:54:37+5:30
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, पाहा कोण-कोण आहेत?
भोपाळ : मध्य प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. मात्र, मध्य प्रदेशातभाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. मधल्या दीड वर्षाचा अपवाद वगळता २००३ पासून इथे भाजपाची सत्ता आहे. दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. हे नेते मध्य प्रदेशातील पक्षाची आघाडी सांभाळतील आणि उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार करतील.
स्टार प्रचारकांची यादी
1. नरेंद्र मोदी
2. जेपी नड्डा
3. राजनाथ सिंह
4. अमित शाह
5. नितीन गडकरी
6. शिवप्रकाश
7. शिवराज सिंह चौहान
8. सत्यनारायण जातिया
9. विष्णू दत्त शर्मा
10. योगी आदित्यनाथ
11. अर्जुन मुंडा
12. पियुष गोयल
13. नरेंद्रसिंग तोमर
14. स्मृती इराणी
15. ज्योतिरादित्य सिंधिया
16. भूपेंद्र यादव
17. अश्विनी वैष्णव
18. वीरेंद्रकुमार खटिक
19. अनुराग ठाकूर
20. देवेंद्र फडणवीस
21. हिमंता बिस्वा सरमा
22. कैलाश विजयवर्गीय
23. केशव प्रसाद मौर्य
24. ब्रिजेश पाठक
25. फग्गनसिंग कुलस्ते
26. प्रल्हाद पटेल
27. एस.पी. सिंग बघेल
28. कृष्णपाल गुर्जर
29. मनोज तिवारी
30. जयभान सिंग पवैया
31. हितानंद
32. नरोत्तम मिश्रा
33. गोपाल भार्गव
34. राजेंद्र शुक्ल
35. लालसिंग आर्य
36. कविता पाटीदार
37. उमाशंकर गुप्ता
38. गणेश सिंग
39. गौरीशंकर बिसेन
40. रामलाल रौतेल