कार थांबवून राहुल गांधी यांचा फुले वेचणाऱ्या महिलांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 06:01 IST2024-04-10T06:01:03+5:302024-04-10T06:01:38+5:30

जाणून घेतल्या समस्या आणि आव्हाने, व्हिडीओ व्हायरल

Stopping the car, Rahul Gandhi interacts with women picking flowers | कार थांबवून राहुल गांधी यांचा फुले वेचणाऱ्या महिलांशी संवाद

कार थांबवून राहुल गांधी यांचा फुले वेचणाऱ्या महिलांशी संवाद

भोपाळ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील जंगलात मोहाची फुले गोळा करणाऱ्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि त्यांच्यासमोरील आव्हाने जाणून घेतली, असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. यावेळी या महिलांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले.

उमरिया शहराजवळील घनदाट जंगलात मोहाची झाडे मुबलक प्रमाणात असून, त्यांची फुले आदिवासी समुदायांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. राहुल हे मंगळवारी सकाळी प्रवास करत असताना त्यांना उमरिया शहराजवळील जंगलात काही महिला मोहाची फुले गोळा करताना दिसल्या. तेव्हा कार थांबवून ते त्या महिलांपाशी गेले आणि त्यांच्या समस्या व त्यांच्यासमोरील आव्हाने जाणून घेतली. 

Web Title: Stopping the car, Rahul Gandhi interacts with women picking flowers