शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं, 400 हून अधिक जागा का हव्यात हेही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 19:40 IST

काँग्रेसने काही वर्षांपूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प केला होता. ते अपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेलत आहेत."

आपल्या संविधानानुसार, धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाऊ शकत नाही. मात्र काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात तसे आश्वासन दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर दलित, आदिवासी आणि ओबीसी प्रवर्गाला दिलेले आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी 400 जागांची गरज आहे, असे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. ते मध्य प्रदेशातील सागर येथे एका प्रचार सभेत बोलत होते.

धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प - मोदी म्हणाले, "आज काँग्रेसचे एक असे सत्य देशासमोर आले आहे, जे ऐकून देशातील प्रत्येक नागरिक अवाक झाला आहे. धर्माच्या आधारावर कुणालाही आरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे आपल्या संविधानात स्पष्टपणे नमूद आहे. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः धर्माच्या आधारावर आरक्षणाच्या विरोधात होते. मात्र, काँग्रेसने काही वर्षांपूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प केला होता. ते अपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेलत आहेत."

OBC चा हक्क हिसकावून मुस्लिमांना दिला -पीएम मोदी म्हणाले, "गेल्या वेळी कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण दिले होते. यासाठी काँग्रेसने मागच्या दाराने आणि बेकायदेशीरपणे चलाखी केली होती. ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा गुन्हा काँग्रेसने केला होता. यासाठी त्यांनी मुस्लिमांच्या सर्व जातींना ओबीसी कोट्यात टाकले आहे. असे करून त्यांनी ओबीसींचे मोठे अधिकार हिरावून घेतले आणि धर्माच्या आधारावर दिले. हाच फॉर्म्युला संपूर्ण देशात लागू करण्याची काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेस OBC प्रवर्गाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्यांनी OBC समाजाचा हक्क हिरावला आहे. काँग्रेसने सामाजिक न्यायाची हत्या केली आहे. संविधानाचा अनादर केला आहे आणि बाबासाहेबांचाही घोर अपमान केला आहे."

का हव्या आहेत 400 हून अधिक जागा? खुद्द पंतप्रधान मोदींनीच सांगितलं -"बंधूंनो, हे मला प्रश्न विचारतात, 400 हून अधिक जागा का? मी उत्तर देतो, आपण राज्यांमध्ये जी चलाखी करत आहात, आपण दलित, आदिवासी आणि ओबीसींचे आरक्षण चोरी करण्याचा लुटण्याचा जो खेळ खेळत आहात, आपला हा खेळ कायमचा बंद करण्यासाठी, आपल्या मनसुब्यांना कायमचे टाळे ठोकण्यासाठी मोदीला 400 हून अधिक जागा हव्या आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी