शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
4
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
5
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
6
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
7
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
8
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
9
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
10
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
11
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
12
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
13
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
14
मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
15
जो रुटच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम; कपिल पाजींवर पाकविरुद्ध ओढावली होती अशी नामुष्की
16
केरळमध्ये वेगाने पसरला 'ब्रेन ईटिंग अमीबा'; २०२५ मध्ये १७० जणांना संसर्ग, ४२ जणांचा मृत्यू
17
Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण
18
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
19
IndiGo: मोठी बातमी! इंडिगो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार
20
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
Daily Top 2Weekly Top 5

भाषणादरम्यान अचानक कोसळला स्टेज, मुख्यमंत्री थोडक्यात बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 09:57 IST

Lok shabha Elections 2024 : ही घटना छत्रसाल परिसरात घडली.

छतरपूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांना वेग आला आहे. मध्य प्रदेशात सुद्धा उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार सरु आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव एक प्रचार सभेदरम्यान भाषण देण्यासाठी स्टेजवर गेले. यावेळी स्टेजवर लोकांची गर्दी वाढली असता स्टेज कोसळला. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना वेळेत स्टेजवरून खाली उतरवले. त्यामुळे मुख्यमंत्री मोहन यादव थोडक्यात बचावले.

ही घटना छत्रसाल परिसरात घडली. मुख्यमंत्री मोहन यादव आणि टीकमगड लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंह जेव्हा तात्पुरत्या स्टेजवर भाषण देण्यासाठी गेले. तेव्हा अनेक लोक स्टेजवर चढले. यानंतर मोठ्या गर्दीमुळे स्टेज कोसळू शकतो, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मात्र, तेवढ्यात स्टेजचा कोसळत असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्टेजवर पोहोचून त्यांना स्टेजवरून खाली आणले.

दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी माईकवरून स्टेज कोसळणार असल्याचे सांगितले होते आणि काही वेळातच स्टेज तुटला. मुख्यमंत्री जिथे उभे होते, तिथे स्टेजचा प्लाय तुटल्याने मुख्यमंत्री पडता-पडता थोडक्यात बचावले. या घटनेनंतर मुख्यमंत्री मोहन यादव आपल्या गाडीकडे गेले. दरम्यान, यावेळी स्टेज कोसळला, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

26 एप्रिलला मतदानस्टेजवरील मोठ्या गर्दीमुळे मुख्यमंत्री मोहन यादव हे खाली उतरले, असे भाजपा आमदार ललिता यादव यांचे पुत्र पक्ष नेते राजेंद्र यादव यांनी सांगितले. मुख्यमंत्री आपल्या पक्षाला पाठिंबा मिळवण्यासाठी रोड शोचे नेतृत्व करण्यासाठी स्टेजवर चढले होते. दरम्यान, टिकमगड जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे.

टॅग्स :madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४tikamgarh-pcटिकमगढMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा