शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:46 IST

महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधानांसह तब्बल 72 मंत्र्यांनी रविवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यातील एक नाव म्हणजे, मध्य प्रदेशातील सावित्री ठाकुर. त्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून लोकसभेवर  पोहोचल्या आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे. माळवा भागातील आदिवासी महिला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक वर्षे कठीन परिश्रम घेले आहेत.

सावित्री ठाकुर या 'दीदी' नावाने ओळखल्या जातात. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राधेश्याम मूवेल यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. 1996 मध्ये त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. त्या एका स्वयंसेवी संस्थेशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी धारमधील आदिवासी आणि गरीब महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करायला सुरुवात केली. महिलांना छोट्या स्वरुपाचे कर्ज मिळवून देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, याशिवाय, दारूबंदीसाठीही त्यांनी अथक परिश्रम घेतले. दहावी उत्तीर्ण असलेल्या सावित्री ठाकूर यांनी साधारणपणे एका दशकापर्यंत समाजसेविका म्हणून काम केल्यानंतर 2003 मध्ये राजकारणात प्रवेश केला.

राजकारणात प्रवेश  करणाऱ्या ठाकुर या आपल्या कुटुंबातील पिहिल्याच सदस्य आहेत. त्यांचे वडील वनविभागातून निवृत्त  झाले आहेत. तर पती एक शेतकरी आहेत. त्या 2003 मध्ये भाजपमध्ये आल्या आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्या. यानंतर एकाच वर्षांत पक्षाने त्यांना जिल्हापरिषद अध्यक्ष बनवले. 2014 मध्ये ठाकुर यांना धारमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले होते. तेव्हा त्यांनी १ लाख मतांनी विजय मिळवला होता. 2019 मध्ये पक्षाने त्यांना तिकीट दिले नव्हते. मात्र, यावेळी पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वासदाखवला आणि त्यांनीही पक्षाला निराश केले नाही.

सावित्री ठाकुर यांनी पक्षातही अनेक जबाबदाऱ्यांवर काम केले आहे. त्या 2010 मध्ये जिल्हा उपाध्यक्ष झाल्या होत्या. यानंतर 2013 मध्ये त्या कृषी उत्पन्न बाजार धामनोदच्या संचालक झाल्या. 2017 मध्ये, सावित्री यांना किसान मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. आता त्या आदिवासी महिला विकास परिषदेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

त्या अत्यंत नम्र असून शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर नेहमीच अग्रेसर असतात. त्या खते आणि बियाणांचे प्रश्न सातत्याने मांडत असतात. त्यांनी गावांतील दारूच्या दुकानांनाही कडाडून विरोध केला. महत्वाचे म्हणजे, धारमधील आठ विधानसभा जागांपैकी पाच जागा काँग्रेसकडे आहेत. यामुळे ठाकूर यांना मोदी मंत्रिमंडळात घेतल्याने या जागांवर भाजपला फायदा होऊ शकतो.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश