मोदींनी आपल्याच तीन मंत्र्यांचे तिकीट 'कापले'! एकूण सात खासदारांना मध्य प्रदेशातून उतरविले, दुसरी यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 22:05 IST2023-09-25T22:04:58+5:302023-09-25T22:05:57+5:30
2018 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या. 230 सदस्यांच्या विधानसभेतील बहुमतापेक्षा दोन कमी होत्या.

मोदींनी आपल्याच तीन मंत्र्यांचे तिकीट 'कापले'! एकूण सात खासदारांना मध्य प्रदेशातून उतरविले, दुसरी यादी जाहीर
मध्य प्रदेशमध्येभाजपाने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये काही धक्कादायक नावे आहेत. मोदींनी आपल्याच तीन मंत्र्यांना राज्यातून निवडणूक लढविण्यास लावली आहे. यामध्ये नरेंद्र सिंह तोमर, फग्गन सिंह कुलस्ते आणि प्रल्हाद सिंह पटेल यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे.
भाजपाने ३९ विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महासचिव कैलास विजयवर्गीय यांचेही नाव आहे. विजयवर्गीय यांना इंदौर १ मधून तिकीट देण्यात आले आहे. मुरैना जिल्ह्यातील दिमनी मतदारसंघातून नरेंद्र सिंह तोमर, नरसिंगपूर विधानसभा मतदारसंघातून प्रल्हाद पटेल आणि केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच खासदार रीती पाठक यांनाही सिधी मतदारसंघातून उतरवले आहे.
उर्वरित खासदारांमध्ये गणेश सिंह, राकेश सिंह आणि उदयप्रताप सिंह यांची नावे आहेत. 17 ऑगस्ट रोजी भाजपने पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये 39 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. भाजपने आतापर्यंत ७८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
2018 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या. 230 सदस्यांच्या विधानसभेतील बहुमतापेक्षा दोन कमी होत्या. भाजपने 109 जागा जिंकल्या होत्या. बसपाला दोन तर इतरांना पाच जागा मिळाल्या. त्यानंतर काँग्रेसने बसपा, सपा आणि इतरांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्यात आले होते. परंतू हे सरकार दीड वर्षच टिकले होते.