देवासमध्ये घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील ४ मृत्यू; पती-पत्नीसह २ मुलांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 08:21 IST2024-12-21T08:20:50+5:302024-12-21T08:21:08+5:30
या आगीचं कारण अस्पष्ट असून त्याचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

देवासमध्ये घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील ४ मृत्यू; पती-पत्नीसह २ मुलांचा समावेश
देवास - मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा एका घराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. देवास शहरातील नयापुरा भागात ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहचल्या. ही आग विझवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. मृत चौघांमध्ये २ लहान मुलांचा समावेश आहे. घराच्या तळमजल्याला असलेल्या डेअरीला आग लागली आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.
पाहता पाहता संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडलं. यात दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पती-पत्नी आणि २ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये पती दिनेश, पत्नी गायत्री, मुलगी इशिका आणि मुलगा चिराग यांचा समावेश आहे. दिनेश हे कारपेंटर म्हणून काम करत होते. त्यांच्या घराच्या ग्राऊंड फ्लोअरला डेअरीचं दुकान होते. या आगीचं कारण अस्पष्ट असून त्याचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.