शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेची उमेदवारी मिळूनही भाजपचा दिग्गज नेता नाराज; नेमकं काय कारण..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 13:32 IST

भाजपने मध्य प्रदेश विधानसभेसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे.

Madhya Pradesh Election: या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, यंदा भाजपने काही खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यात पक्षाचे दिग्गज नेते कैलाश विजयवर्गीय यांना इंदूरमधून उमेदवारी मिळाली आहे. मात्र, निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे विजयवर्गीय यांचे म्हणणे आहे.

निवडणूक लढवण्याची इच्छा नाहीतिकीट मिळाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय बडा गणपती चौकात पोहोचले, यादरम्यान ते मंचावरून म्हणाले की, 'पक्षाकडून माझ्या नावाची घोषणा झाल्यावर मी गोंधळलो आणि आश्चर्यचकितही झालो. मी देवासमोर हात जोडून सांगतो की, माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. आता मी मोठा नेता झालोय, मला जाहीर सभा घ्यायच्या आहेत, हेलिकॉप्टर देशभर फिरायचे आहे. लोकांपुढे हात जोडून मतदान मागण्याचा विचार केला नव्हता.' 

निवडणुकीसाठी वेगळीच योजना आखली होतीते पुढे म्हणाले की, 'या निवडणुकीसाठी मी वेगळा प्लॅन केला होता. मी रोज 8 सभा घेईन असे वाटले होते, पण देवाच्या मनात काही वेगळेच होते. मी निवडणूक लढवून पुन्हा जनतेत जावे, अशी देवाची इच्छा आहे. पक्षाने मला उमेदवार केले, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असे पक्षाला सांगितले होते, परंतु पक्षाकडून मला काही सूचना मिळाल्या आहेत', असेही ते यावेळी म्हणाले.

गणपतीसमोर भजन गायलेपक्षाकडून तिकीट मिळाल्यानंतर पहिल्यांदाच कैलाश विजयवर्गीय आपल्या उमेदवारांसह गणपती चौकात पोहोचले, तिथे त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी विजय वर्गीय यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. गणेश मंडपात पोहोचल्यानंतर विजयवर्गीय यांनी भजनही गायले. दरम्यान,  कैलाश वर्गीय हे मध्य प्रदेशच्याराजकारणातील एक मोठे नाव आहे. ते भाजपचे दिग्गज नेते आहेत. नुकतीच भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली असून त्यात पक्षाचे चार खासदार आणि तीन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीतही पक्षाने खासदारांना तिकीट दिले आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपा