नवीन फ्रीज चालू करताच झाला स्फोट; छतासह भिंती कोसळल्या, घरातील सामानही जळून खाक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 14:38 IST2023-06-21T13:39:44+5:302023-06-21T14:38:21+5:30

स्फोटाचा आवाज होताच घरातील लोक बाहेर पळाले.

Madhya Pradesh morena, new fridge exploded as soon as it was turned on; walls and roof collapsed | नवीन फ्रीज चालू करताच झाला स्फोट; छतासह भिंती कोसळल्या, घरातील सामानही जळून खाक...

नवीन फ्रीज चालू करताच झाला स्फोट; छतासह भिंती कोसळल्या, घरातील सामानही जळून खाक...

मध्य प्रदेशातील मुरैनामध्ये रेफ्रिजरेटरचा स्फोट होऊन घर कोसळल्याची घटना घडली आहे. स्फोटाचा आवाज ऐकून घरातील लोक लगेच बाहेर पळाले, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटानंतर घराला आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याचे घरमालकाचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेफ्रिजरेटरचे कॉम्प्रेसर ब्लास्ट झाले आहे. 

मुरैना येथील नगर सेन रोड मंदिर परिसरात राहणारे टिंकू माहोरे यांनी सोमवारी त्यांच्या घरी केल्विनेटर कंपनीचा नवीन फ्रीज आणला होता. नवीन फ्रीज घरात आल्यामुळे सगळेजण खुश होते. मंगळवारी सायंकाळी रेफ्रिजरेटर चालू केल्यानंतर घरातील सर्व सदस्य बाहेरच्या खोलीत बसले. यावेळी अचानक फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला.

कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने घराचे छत आणि मागील भाग कोसळला. खोलीत ठेवलेले इलेक्ट्रॉनिक्स सामान आणि कपड्यांसह घरातील इतर साहित्य जळून खाक झाले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले होते.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

 

Web Title: Madhya Pradesh morena, new fridge exploded as soon as it was turned on; walls and roof collapsed