'क्रिकेटमध्ये धोनी, तर राजकारणात राहुल गांधी...'! प्रचार सभेत राजनाथ सिंहांची जोरदार फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 11:41 AM2024-04-07T11:41:32+5:302024-04-07T11:43:31+5:30

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी एका प्रचार सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, त्यांना भारतीय राजकारणातील 'सर्वश्रेष्ठ फिनिशर' म्हटले आहे. तसेच त्यांची तुलना माजी भारतीय क्रिकेट माही अर्थात महेंद्र सिंह धोनीसोबत केली आहे. 

Lok sabha election 2024 Dhoni is the best finisher in cricket and Rahul Gandhi in the politics Rajnath Singh's hard hitting in the campaign meeting | 'क्रिकेटमध्ये धोनी, तर राजकारणात राहुल गांधी...'! प्रचार सभेत राजनाथ सिंहांची जोरदार फटकेबाजी

'क्रिकेटमध्ये धोनी, तर राजकारणात राहुल गांधी...'! प्रचार सभेत राजनाथ सिंहांची जोरदार फटकेबाजी

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. नेतेमंडळी एक-मेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी एका प्रचार सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, त्यांना भारतीय राजकारणातील 'सर्वश्रेष्ठ फिनिशर' म्हटले आहे. तसेच त्यांची तुलना माजी भारतीय क्रिकेट माही अर्थात महेंद्र सिंह धोनीसोबत केली आहे. 

यावेळी, राजनाथ सिंह यांनी उपस्थित जनतेला विचारले क्रिकेटमधील सर्वात चांगला फिनिशर कोन? यावर जनतेतून आवाज आला 'धोनी'. यावर राजनाथ सिंह म्हणाले, 'जर कुणी आम्हाला विचारले की, भारतीय राजकारणातला सर्वात चांगला फिनिशर कोन? तर आम्ही सांगू राहुल गांधी. यामुळेच तर अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.'

भ्रष्टाचार आणि काँग्रेसचे अतूट नाते -
मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, 'भ्रष्टार आणि काँग्रेसचे अतूट नाते आहे. एक गाणे होते, 'तू चल मैं आई...' असेच नाते भ्रष्टाचार आणि काँग्रेसचे आहे. भ्रष्टाचार म्हणतो, 'ए काँग्रेस तू चल मैं आई'. आपण बघितलेच असेल, जेथे काँग्रेस आली, तेथे भ्रष्टाचारही पोहोचला. अधिकांश काँग्रेस सरकारांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारातील कुण्याही मंत्र्याविरोधात, असे आरोप लागले नाही."

भारत 2045 पर्यंत होणार महासत्ता -
राजनाथ सिंह म्हणाले, भारत 2045 पर्यंत महासत्ता होईल. काँग्रेसने सत्तेत असताना अनेक आश्वासने दिली, ती आंशिकदृष्ट्याजरी पाळली गेली असती तर भारत फार पूर्वीच एक शक्तीसंपन्न देश बनला असता. मात्र, दुसरीकडे भाजपने दहा वर्षांत जी आश्वासने दिली, ती सर्वच्या सर्व पूर्ण केली आहेत.

Web Title: Lok sabha election 2024 Dhoni is the best finisher in cricket and Rahul Gandhi in the politics Rajnath Singh's hard hitting in the campaign meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.