शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात कमलनाथ, दिग्विजय सिंह युगाचा अस्त; काँग्रेस नेतृत्वाने केले मोठे फेरबदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 07:12 IST

दिग्विजय सिंह (७६) यांचे चिरंजीव जयवर्धन सिंह आणि अन्य एक नेते अजय सिंह यांना कोणतीही जबाबदारी देण्यास पक्षाने नकार दिला आहे.

- अभिलाष खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्क भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ (७७) यांना पदावरून बाजूला करत पक्ष नेतृत्वाने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का दिला आहे. यानिमित्ताने पक्षाने नेतृत्वाची पिढीच बदलली आहे. तथापि, नव्या बदलांमुळे पक्ष कार्यकर्ते मात्र खुश आहेत. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (७६) यांचे चिरंजीव जयवर्धन सिंह आणि अन्य एक नेते अजय सिंह यांना कोणतीही जबाबदारी देण्यास पक्षाने नकार दिला आहे. यामुळे मध्य प्रदेशातील राजकारणात दिग्विजय सिंह युगाचा हा अस्त मानला जात आहे. छिंदवाडा येथून १९८० मध्ये लोकसभा निवडणूक लढवत कमलनाथ यांनी मध्य प्रदेशच्या राजकारणात प्रवेश केला. तर, दिग्विजय सिंह हे १९८० च्या दशकात अर्जुन सिंह यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले. तेव्हापासून एकेकाळी अगदी जवळचे असलेले दोन्ही नेते राज्याच्या राजकारणात एक प्रकारे वर्चस्व गाजवत होते. 

नव्या चेहऱ्यांना संधी आता कमलनाथ हे छिंदवाडा येथून आमदार आहेत आणि त्यांचे चिरंजीव नकुल हे स्थानिक खासदार आहेत. राऊ येथून पराभूत झालेले उमेदवार जितू पटवारी हे आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. कमलनाथ यांची सक्रिय राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याचे हे संकेत मानले जात आहेत. दिग्विजय सिंह हे राज्यसभेत खासदार आहेत. याचवेळी पक्षाने उमंग सिंघार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे.

दिग्विजय सिंह हे दोनवेळा प्रदेशाध्यक्ष होते. १९९३ मध्ये ते मुख्यमंत्री झाले. २००३ मध्ये त्यांचा पराभव झाला. कमलनाथ यांनी यावेळी केंद्रीय राजकारणावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने २०१८ मध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्या, पण त्यांचे सरकार १५ महिन्यांतच पडले.   

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहMadhya Pradeshमध्य प्रदेश