शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘लाडली बहना’मुळे विजय मिळाला नाही; भाजपचे विजयवर्गीय यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 07:08 IST

शिवराजसिंह यांचे तरुणपणातील जिवलग मित्र कैलाश विजयवर्गीय यांनी चौहान यांच्या ‘लाडली बहना योजने’मुळे भाजप पुन्हा सत्तेत आल्याचा दावा फेटाळून लावला.

अभिलाष खांडेकर

भोपाळ : मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा तीव्र होत असताना एकेकाळचे जवळचे मित्र प्रतिस्पर्धी बनल्याचे दिसून येत आहे. राज्यात अनपेक्षितरीत्या मोठ्या फरकाने निवडणूक जिंकल्यानंतर भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे; परंतु निकालानंतर ४८ तासांनंतरही मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झालेले नाही. 

शिवराजसिंह यांचे तरुणपणातील जिवलग मित्र कैलाश विजयवर्गीय यांनी चौहान यांच्या ‘लाडली बहना योजने’मुळे भाजप पुन्हा सत्तेत आल्याचा दावा फेटाळून लावला. त्यांनी म्हटले की, जर ‘लाडली बहना’ हेच मोठ्या विजयाचे कारण असेल तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला सत्ता कशी मिळाली?

चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर त्यांचे यश हिरावून घेण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. दरम्यान, भाजप पक्षश्रेष्ठींनी लवकर मुख्यमंत्री निवडण्याचे कोणतेही संकेत न देऊन शिवराजसिंह यांना प्रतीक्षेत ठेवले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची तारीख अद्याप कळालेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिल्लीत मुख्यमंत्री निवडण्याची तशी घाई नाही, असे पत्रकारांना सांगितले.

हेही आहेत शर्यतीत...भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, नरेंद्रसिंह तोमर आणि प्रल्हाद पटेल हे या पदासाठी इतर दावेदार आहेत; परंतु कोणीही ते शर्यतीत असल्याचे मान्य केले नाही. भाजपचे वजनदार नेते विजयवर्गीय हे शाह यांच्या निकटवर्तीयांमध्ये आघाडीवर आहेत.

मी कधीच दावेदार नव्हतो : शिवराजसिंहमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी सांगितले की, मी यापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार नव्हतो किंवा आताही नाही. पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने, भाजपने मला जे काही काम दिले आहे ते मी नेहमीच समर्पण आणि प्रामाणिकपणे पार पाडले आहे.  मोदीजींच्या नेतृत्वाखाली शक्तिशाली भारताची निर्मिती होत आहे. मोदीजी हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला नेहमीच अभिमान आणि आनंद वाटतो. 

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपा