"केवळ लाडली बहना योजनेमुळे नाही तर...", कैलाश विजयवर्गीयांनी विजयाचे श्रेय PM मोदींना दिले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 04:07 PM2023-12-04T16:07:02+5:302023-12-04T16:08:39+5:30

कैलाश विजयवर्गीय यांनी विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना दिले आहे. 

kailash vijayvargiya gives credit to pm narendra modi not ladli bahna yojanan, mp election results 2023  | "केवळ लाडली बहना योजनेमुळे नाही तर...", कैलाश विजयवर्गीयांनी विजयाचे श्रेय PM मोदींना दिले 

"केवळ लाडली बहना योजनेमुळे नाही तर...", कैलाश विजयवर्गीयांनी विजयाचे श्रेय PM मोदींना दिले 

भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya)यांनी इंदूर (Indore) विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीत कैलास विजयवर्गीय यांनी प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार संजय शुक्ला यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. आपल्या विजयानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना दिले आहे. 

केंद्रीय नेतृत्वामुळेच आम्ही मध्य प्रदेश आणि राजस्थानसह छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन करत आहोत. जनतेचा आशीर्वाद मिळत आहे. भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकला आहे. या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे योगदान आहे, असे कैलाश विजयवर्गीय म्हणाले. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल लोकांमध्ये आदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात मध्य प्रदेश आहे आणि मध्य प्रदेशच्या मनात पंतप्रधान आहेत. हे स्पष्ट दिसत आहे. या पलीकडे काही नसल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबर, कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही 400 हून अधिक जागा जिंकू. आम्ही जे बोललो ते आम्ही केले आहे. आता आम्ही आणखी मजबूत स्थितीत आहोत आणि राज्याला विकासाच्या दिशेने नेऊ, असेही ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, अजून काम करायचे आहे. केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य असेल. मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लागू केलेल्या लाडली बहना योजनेचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, यावर बोलताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, केवळ आम्हाला लाडली बहना योजनेचा लाभ मिळाला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आम्ही ही निवडणूक जिंकलो, कारण राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये लाडली बहनाचा फॅक्टर नाही. अशा स्थितीत केवळ लाडली बहना योजनेमुळे मध्य प्रदेशात भाजपने निवडणूक जिंकली असे म्हणता येणार नाही.

Web Title: kailash vijayvargiya gives credit to pm narendra modi not ladli bahna yojanan, mp election results 2023 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.