मध्य प्रदेशातील अनूपपूर येथे भीषण अपघात घडला आहे. येथे एक जीप आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली एक जीप एका दुचाकीला धडकली. यानंतर, ती अनियंत्रित होऊन एका घरात घुसली. या भीषण अपघातात एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एका सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संबंधित जीपमधून काही लोक जरिया टोला येथून बेलिया छोटकडे जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या दुचाकीला जीप धडकली. या अपघातात दोन दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर, जीप अनियंत्रित होऊन जवळच्याच एका घराला जाऊन धडकली. या धडकेत जीपमधील तीन जणांच जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी केली घटना स्थळाची पाहणी -अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. याशिवाय पोलीस जवळपासच्या लोकांकडून घटनेची माहितीही एकत्र करत आहेत.