मला इच्छामरण द्या, अन्यथा जेवण सोडेन; शिक्षिकेची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 08:37 IST2025-07-29T08:36:53+5:302025-07-29T08:37:03+5:30
मृत्यूनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांनी माझ्या आजारावर संशोधन करावे, अशी माझी इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मला इच्छामरण द्या, अन्यथा जेवण सोडेन; शिक्षिकेची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी
इंदूर (मध्यप्रदेश) : इंदूरच्या एका सरकारी शाळेतील ५२ वर्षीय शिक्षिकेने हाडांच्या गंभीर आजाराने त्रस्त होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे इच्छामृत्यूची परवानगी मागितली आहे. मी इच्छामृत्यूच्या परवानगीची एक-दोन आठवडे वाट पाहीन. अन्यथा अन्न-पाण्याचा त्याग करीन, असेही शिक्षिकेने म्हटले आहे.
तथापि, प्रशासनाने समुपदेशन केले असले तरी निर्णय बदललेला नाही. शिक्षिका चंद्रकांता जेठवानी यांनी सोमवारी सांगितले की, त्या मागील अनेक वर्षांपासून ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा नामक आजाराने त्रस्त आहेत. हा आनुवंशिक आजार असून, यात हाडांचे निर्माण प्रभावित होते. यामुळे हाडे अतिशय कमजोर होतात. मी इच्छामृत्यूची परवानगी मागितली असून, माझे डोळे व देहदान आधीच केलेले आहे.
मृत्यूनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांनी माझ्या आजारावर संशोधन करावे, अशी माझी इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्या अविवाहित असून २०२० पासून व्हीलचेअवरच राहवे लागते आहे.