शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Election Result 2023 : कर्ज काढून निवडणूक लढली अन् झाला आमदार; भाजपा-काँग्रेस उमेदवाराचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 12:49 IST

madhya pradesh election 2023 : मध्य प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं.

Sailana Results 2023 : मध्य प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाने नेत्रदीपक कामगिरी केली. खरं तर भाजपाने राज्यात सत्ता मिळवली असली तरी भाजपाच्या काही तगड्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. अशातच मध्य प्रदेशातील सैलाना विधानसभा मतदारसंघातील जागेनं सर्वांचं लक्ष वेधलं. इथं कर्ज काढून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारानं भाजपा आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून आमदार होण्याचा मान पटकावला. 

दरम्यान, सैलाना विधानसभा मतदारसंघात भारत आदिवासी पक्षाचे कमलेश्वर डोडियार विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या हर्ष विजय गेहलोत यांचा ४ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला. या जागेवर भाजपा तिसऱ्या क्रमांकावर आहे. कमलेश्वर यांची कहाणी फार गमतीशीर तितकीच संघर्षमय आहे. त्यांनी कर्ज घेऊन ही निवडणूक लढवली अन् राजकीय पंडितांचा पोल खोटा ठरवला. काँग्रेस उमेदवाराचा ४,६१८ मतांनी पराभव करून कमलेश्वर यांनी सर्वांना धक्का दिला.

कर्ज काढलं अन् झाला आमदार भारतीय आदिवासी पक्षाकडून निवडणूक लढलेल्या कमलेश्वर डोडियार यांना एकूण ७१,२१९ मतं मिळाली. तर काँग्रेसचे हर्ष विजय गेहलोत ६६,६०१ मतांसह दुसऱ्या आणि भाजपाच्या संगीता चोरेल ४१,५८४ मतांसह तिसऱ्या स्थानी राहिल्या. सैलाना हा मतदारसंघ राजस्थानच्या सीमेला लागून आहे. लक्षणीय बाब म्हणजे कर्ज काढून निवडणूक लढवली आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारालाही पराभूत केल्यामुळे कमलेश्वर प्रसिद्धीच्या झोतात आले. आता हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी समाजाला मदतीचे आवाहन केले आहे. कमलेश्वर यांनी निवडणुकीत १२ लाख रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. निवडणुकीत खर्च होणारा सगळा पैसा कर्ज काढून गोळा केला, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMLAआमदारElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस