शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

भाजपा आमदाराने काढली स्वपक्षीय महिला खासदाराची छेड, काँग्रेसचा आरोप, मिळालं असं प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 6:06 PM

Madhya Pradesh News: मध्य प्रदेश काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत राज्यातील चुरहट मतदारसंघातील भाजपा आमदार शरदेंदू तिवारी यांनी आपल्याच पक्षाच्या खासदार रिती पाठक यांची छेड काढल्याचा आरोप केला आहे.

मध्य प्रदेशकाँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत राज्यातील चुरहट मतदारसंघातील भाजपा आमदार शरदेंदू तिवारी यांनी आपल्याच पक्षाच्या खासदार रिती पाठक यांची छेड काढल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भातील व्हिडीओसुद्धा शेअर केले आहेत. तसेच ही बाब खूप लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे. सरकारी कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोरच भाजपा खासदारांची छेड काढण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

@INCMP या हँडलवरून व्हिडीओ शेअर करताना लिहिण्यात आलं आहे. की, बेशरम भाजपा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोरच भाजपाच्या महिला खासदाराची छेड काढली गेली. भाजपा खासदार रीति पाठक यांच्यासोबत भर मंचावर भाजपा आमदार शरदेंदू तिवारी यांनी जे काही केलं ते आमच्या संस्कृती आणि संस्कारांविरोधात आहे. शिवराजजी भाजपा नेत्यांपासून मुलींना वाचवा. 

दरम्यान, काँग्रेसने केलेल्या या आरोपांना सीधी येथील भाजपा खासदार रिती पाठक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसचे आरोप पाहून मला हसू येतंय. काँग्रेसकडे काही काम उरलेलं नाही वाटतं. ते इतरांनाही स्वत:सारखेच समजतात. काँग्रेस या प्रकरणाकडे आपल्याच नजरेनं पाहत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून जे काही लिहिलं आहे, ते सर्व यांच्या पक्षामध्ये होतं. आमच्याकडे अशी परंपरा नाही. भाजपा एक कुटुंब आहे. या पक्षामध्ये भाऊ बहिणीच्या पवित्र संबंधांसह काम केलं जातं. काँग्रेसची चुकीची विचारसरणी असून, त्यांच्याकडून चुकीची विधानं केलं जात आहेत.

दरम्यान, भाजपा आमदार शरदेंदू तिवारी यांनी सांगितले की, भाऊ बहिणीच्या नात्याची समज काँग्रेसींना नाही आहे. रिती पाठक ह्या मला राखी बांधतात.  कार्यक्रमामध्ये दोरी पकडण्यासाठी मी हात पुढे केला होता. हाच व्हिडीओ वारंवार रिपीट करून दाखवला जात आहे. प्रत्यक्षात आपल्या पराभवाच्या भीतीने काँग्रेसची मानसिकता कुत्सित आणि विकृत बनली आहे. या प्रकरणी मी काँग्रेसला सोडणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस