शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दिवाणखाना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 9:20 AM

दिवाणखाना म्हणजेच लिव्हिंग रूम. कुटुंबाची ओळख करून देणारी जागा. ही जागा घरी येणाऱ्या प्रत्येकाशी बोलते. स्वागताला सज्ज असते. तिचं रंगरूप कसं ठरवणार?

- ऋषिकेश खेडकर

घर आनेवाले हर शक्स के चेहरे पे मुस्कुराहटसी देखी है मैने।पूछता हुं तो बताते है की आपके दिवानखाने का नूर कुछ बदला हुआ है ।।दिवाणखाना फारसी भाषेतला प्रचलित शब्द. ज्याचा अर्थ दिवाण म्हणजे दरबार आणि खाना म्हणजे घर असा होतो. अर्थाप्रमाणे खरोखरच आपल्या प्रत्येकानं स्वत:च्या घरात एक दरबार थाटलेला असतो. आपण त्या दरबाराचे राजा आणि येणारा व्यक्ती त्या दरबारचा अतिथी. आपला दरबार नीटनेटका, सुंदर आणि प्रभावी असावा असं कोणाला नाही वाटणार हो ?दिवाणखाना किंवा लिव्हिंगरूम ही घरात प्रवेश करताच दिसणारी सर्वप्रथम जागा. त्या घरात राहणाऱ्या कुटुंबाची ओळख करून देणारी जागाच म्हणा ना ! दिवाणखान्याची रचना, त्याच्या भिंती, तिथे असणारा प्रकाश, फर्निचर, रंगसंगती आणि असल्यास काही खास वस्तू. या सगळ्यांच्या सयुक्तिक अनुभवातून ती जागा घरी येणाºया प्रत्येकाशी काहीतरी बोलायला लागते. पाहुणा नवीन असेल तर हा संवाद खूप वेळ चालतो. कुटुंबातील प्रत्येकाची निदान विचारपूस तर या दरबारी नक्कीच होते.दिवाणखान्याची रचना करताना सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातली बैठक. कुटुंबाचा आकार आणि येणाºया पाहुण्यांचं प्रमाण यांचा विचार करून ही बैठक किती माणसांची असावी हे प्रत्येक कुटुंबानं स्वत: ठरवलेलं बरं; पण दिवाणखान्यात या बैठकीची मांडणी करताना पुढील काही गोष्टी जरूर विचारात घ्याव्यात. एक म्हणजे मुख्य प्रवेशद्वारासमोर बैठकीची पाठ असू नये. येणाºया प्रत्येक व्यक्तीला ही बैठक स्वागतपूर्ण आमंत्रित करते आहे असा वाटलं पाहिजे. बैठकीवर साधारणत: तीनपेक्षा जास्त व्यक्ती एका रांगेत शेजारी असतील तर चांगला संवाद साधता येत नाही, अशा वेळेस बैठकीची रचना काटकोनात किंवा चौकोनात असावी. चहापाणी किंवा नास्ता घेऊन स्वयंपाकघरातून येणाºया व्यक्तीला बैठकीचा अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. दिवाणखान्याबाबतचा एक कळीचा प्रश्न जो कायम विचारला जातो तो म्हणजे दिवाणखान्यात टीव्ही असावा की नसावा? मला विचाराल तर या प्रश्नाचं उत्तर कुटुंबाच्या सवयींशी निगडित आहे; पण माझ्या अनुभवातून इतकं नक्की सांगेल की दिवाणखान्यात टीव्ही असल्यानं कौटुंबिक संवादाच्या अनेक क्षणांना आपण मुकतो. दिवाणखान्यातील एखादी भिंत ही रंग, पोत आणि कृत्रिम प्रकाशयोजनेच्या साहाय्यानं वैशिष्ट्यपूर्ण खुलवता येऊ शकते. आपल्या संचयातल्या काही खास गोष्टी, चित्र किंवा फोटो यांची आकर्षक मांडणी जर त्या भिंतीवर केली तर ती भिंत अधिक बोलकी वाटते. येणाºया प्रत्येकाला ती भिंत खुणावते आणि कित्येकवेळा तर दिवाणखान्यात टीव्ही नसल्याची जाणीवसुद्धा आपल्याला होत नाही. सध्याच्या काळात जागेच्या कमतरतेमुळे अनेकांच्या दिवाणखान्यात डायनिंग टेबलही दिसतो. तसं म्हणाल तर दरबारी जेवणाचा आनंद काही औरच; पण आपण जेवण करत असताना अनोळखी व्यक्ती घरी आली तर दोघांनाही जरा अडचणीचं वाटतं. अशावेळेस जागेचं नियोजन करताना शक्य असल्यास बैठक आणि डायनिंग टेबल अगदी समोरासमोर येणार नाही अशी व्यवस्था करावी. अन्यथा दोघांच्यामध्ये कमी उंची असणारं कपाट किंवा छोटासा टेबल आणि त्यावर फुलदाणी मांडली तरी एकाच अवकाशात दोन वेगळ्या जागा केल्याचा आभास बघणाºयाला होतो.प्रकाश नियोजन करतानादेखील एक गोष्ट आवर्जून विचारात घ्यावी ती म्हणजे कृत्रिम प्रकाश नियोजनात शक्यतो भिंतीऐवजी छताचा वापर करावा. ट्यूब लाइट किंवा भिंतीवरील दिव्यांपेक्षा सिलिंग लाइटचा वापर केल्यानं एकसमान प्रकाश दिवाणखान्यात मिळतो. तसेच भिंतीवर किंवा जमिनीवर पडणारी फर्निचरची सावली कमीत कमी करून दिवाणखान्यातील फर्निचरचा उठाव वाढवता येऊ शकतो.जागेअभावी शक्यतो फ्लॅट सिस्टीममध्ये दिवाणखान्याच्या बाबतीत भेडसावणारा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे चप्पल-बूट स्टॅण्ड. प्रत्येक कुटुंबाच्या गरजेप्रमाणे हा स्टॅण्ड किती मोठा असावा ते ठरतं. तसा अगदी साधा वाटणारा हा फर्निचरचा घटक खरं तर दिवाणखान्यातील नियोजनात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. बाहेरून येताना ज्याप्रमाणे आपण चप्पल-बूट काढतो तसेच कित्येकदा गाडीची चावी, छत्री, हेल्मेट अशा काही विशिष्ट रोजच्या वापरातल्या गोष्टी अगदी सहज सवयीनं आपण दिवाणखान्यात जागा मिळेल तिथे ठेवून देतो. कधी या गोष्टीकडे तुम्ही आवर्जून बघितलं तर लक्षात येईल की रोज लागणाºया या गोष्टीचं दिवाणखान्यात काहीच काम नाही, उलट गरज नसताना दिवाणखान्यातील एखादा कोनाडा अडवून त्या अडगळ निर्माण करतात. अशा वेळेस चप्पल-बूट स्टॅण्डचं नियोजन करत असताना बरोबरीनं या गोष्टीचादेखील विचार करावा. याचा मुख्य फायदा म्हणजे एकाच ठिकाणी (शक्यतो मुख्य दरवाजा शेजारी) या गोष्टी ठेवल्यानं घरात वस्तू इतस्तत: पडण्याचं किंवा शोधाशोधीचं प्रमाण खूप कमी होईल आणि यामुळे निर्माण होणाºया अडगळीतून दिवाणखाना मोकळा होईल.

(लेखक हे आर्किटेक्ट आणि प्रॉडक्टडिझायनर आहेतrishi@designnonstop.in)

 

टॅग्स :Homeघर