पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यामध्ये बुडाल्याने मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: May 18, 2023 07:52 IST2023-05-18T07:52:04+5:302023-05-18T07:52:26+5:30

याबाबत शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे. 

Youth who went swimming died due to drowning in water | पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यामध्ये बुडाल्याने मृत्यू

पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यामध्ये बुडाल्याने मृत्यू

शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : पोहायला गेलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शिरुर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथे बुधवारी दुपारी घडली. याबाबत शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी सांगितले, थेरगाव येथील अमित सोनवणे (वय १८) हा युवक बुधवारी दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने अमितचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. 

कर्नाटकी पेच कायम; सत्तावाटपाचे सूत्र ठरले, पण डी. के. शिवकुमार अडून बसले! ठेवल्या 2 मोठ्या मागण्या

याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात धनाजी सोनवणे यांनी दिलेल्या जबाबावरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काॅन्स्टेबल सचिन चामे करत आहेत.

Web Title: Youth who went swimming died due to drowning in water