हरित गाव करण्यासाठी तरुणाईचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:15+5:302021-06-24T04:15:15+5:30
गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, चौक, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, पुतळा परिसर आदी ठिकाणी झाडे लावून त्यांना कुंपण घालण्यात आले. विशेष ...

हरित गाव करण्यासाठी तरुणाईचा पुढाकार
गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, चौक, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, पुतळा परिसर आदी ठिकाणी झाडे लावून त्यांना कुंपण घालण्यात आले. विशेष म्हणजे झाडांची खरेदी, कुंपण तयार करणे हा खर्च तरुणांनी स्वत: केला. प्रा. डाॅ. नारायण कांबळे, प्रा. डाॅ. गोविंद काळे, मुख्याध्यापिका सुनीता काळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, मंडल अधिकारी एस. के. चव्हाण, ग्रामविकास अधिकारी मनोहर जानतीने, तलाठी कुलदीप गायकवाड, मीना आलापुरे, आबासाहेब तेलंगे आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यशस्वीतेसाठी परमेश्वर माने, प्रदीप महाजन, हुसेन पटेल, आसिफ पठाण, डाॅ. रमेश पेंढारकर, साईनाथ चिंतलवार, अमोल मसुरे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दयानंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य खाजा तांबोळी, प्रकाश लोखंडे, पी. एम. मसुरे, अमजदखान पठाण, इतिहास कांबळे, कुमार मसुरे, रवी मसुरे आदी उपस्थित होते.