रेणापूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: November 26, 2023 23:37 IST2023-11-26T23:37:36+5:302023-11-26T23:37:51+5:30

रेणापूर (जि. लातूर) : विजेच्या धक्क्याने एका तीस वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रेणापूर येथे लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे ...

Youth dies due to electric shock in Renapur latur | रेणापूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

रेणापूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

रेणापूर (जि. लातूर) : विजेच्या धक्क्याने एका तीस वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रेणापूर येथे लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. किरण तुकाराम कांबळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

रेणापूर येथील लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात किरण तुकाराम कांबळे हा स्वतःच्या वास्तव्याला आहे. रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास नळाला पाणी आले हाेते. दरम्यान, नळाचे पाणी भरण्यासाठी किरण कांबळे यांनी नळाला विद्युत मोटार लावली. त्यासाठी वायर लावताना विजेचा धक्का बसला आणि ते जमिनीवर काेसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील मंडळी आणि गल्लीतील नागरिकांनी किरण कांबळे यांना तातडीने रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घाेषित केले. परिवाराला मोठा धक्का बसला असून, कुटुंबात ताे कमावणारा एकमेव होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी, तीन मुले असा परिवार आहे. किरण कांबळे यांच्या पार्थिवावर साेमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Youth dies due to electric shock in Renapur latur

टॅग्स :electricityवीज