लातूर शहरात तरुणाची गळफास लावून आत्महत्या
By राजकुमार जोंधळे | Updated: November 2, 2022 16:28 IST2022-11-02T16:28:08+5:302022-11-02T16:28:24+5:30
घरात कोणीच नाही, हे पाहून तरुणाने घेतला गळफास

लातूर शहरात तरुणाची गळफास लावून आत्महत्या
लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एका ४० वर्षीय विवाहित तरुणाने लातुरातील बोधे नगर येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बुधवारी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, शाम विठ्ठल शिंदे (व्यव ४०, रा. बेवनाळ, ता. शिरूर अनंतपाळ) हे मुलांच्या शिक्षणानिमित्त लातुरातील बोधे नगर परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्याला होते. दरम्यान, मंगळवार, १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात कोणीच नाही, हे पाहून शाम शिंदे यांनी पंख्याला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच शिवजी नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
याबाबत आकाश काशिनाथ सुरवसे (रा. जावळी ता. औसा) यांनी दिलेल्या माहितीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक चौगुले करत आहेत.