युवकांनी माेठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST2021-01-03T04:20:56+5:302021-01-03T04:20:56+5:30

रेणापूर येथे पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस ...

Young people need to donate a large amount of blood | युवकांनी माेठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याची गरज

युवकांनी माेठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याची गरज

रेणापूर येथे पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, सपोनि. श्रीराम माच्चेवाड, नागसेन सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष पाेलीस महानिरीक्षक तांबोळी म्हणाले, रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, रक्त वेळेवर उपलब्ध हाेत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी ओळखून युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याची गरज आहे.

कार्यक्रमास डॉ. कांचन भोसले, गिरीश मुसाडे, डॉ. जगन्नाथ कुलकर्णी, अमोल जगताप, नयन पाटील, मेघराज राऊत, एस. माळी, के. कोकाटे, राजकुमार गुळभेले, सदाशिव हुंडेकरी, बाळासाहेब कन्हेरे, मुक्तार शेख, गौतम कांबळे, संतोष गायकवाड, गौतम घाडगे, किरण गंभिरे, अनंत बुधोडकर, अजय तोडकर, किरण शिंदे, बालाजी डप्पडवाड संतोष ठाकरे, दत्ता खुरपे, नरसिंग जाधव यांच्यासह होमगार्ड, विविध संघटनांचे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार सपाेउपनि राजकुमार गुळभेले यांनी मानले.

Web Title: Young people need to donate a large amount of blood