भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
By आशपाक पठाण | Updated: August 9, 2023 17:36 IST2023-08-09T17:35:34+5:302023-08-09T17:36:04+5:30
देवणी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
आशपाक पठाण, देवणी (जि.लातूर): तालुक्यातील विळेगाव शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत देवणी पोलिसांत बुधवारी दुपारी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, विळेगाव शिवारात मंगळवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास उद्धव नागराळे यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनचालकाने हयगय व निष्काळजीपणे वाहन चालवून अंकुश वसंत आडे (वय २४, रा. विळेगाव) यास जोराची धडक दिली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचे भाऊ प्रवीण वसंत आडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवणी पोलिसांत अज्ञात वाहन व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.