वासनगाव शिवारात महिलेचा ठेचून खून; लातूर शहरानजीकची घटना
By राजकुमार जोंधळे | Updated: December 20, 2022 19:18 IST2022-12-20T19:17:57+5:302022-12-20T19:18:44+5:30
केवळ पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आराेपीने या महिलेचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला.

वासनगाव शिवारात महिलेचा ठेचून खून; लातूर शहरानजीकची घटना
लातूर : शहरानजीक असलेल्या वासनगाव शिवारात एका ४० वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी समाेर आली. याबाबत लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात वासनगाव येथील एकाविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, अजय विजय साेनपारखे (वय २२, रा. म्हाडा काॅलनी, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. नंदिनी विजय साेनपारखे (वय ४०) यांचा मृतदेह वासनगाव शिवारातील एका ढाब्याच्या पाठीमागील माेकळ्या जागेत मंगळवारी सकाळी आढळून आला. मदन ऊर्फ मनाेज कदम याने महिलेच्या कपाळावर, डाेक्यावर, ताेंडावर दगडाने ठेचून खून केला. असे पाेलिसांनी सांगितले. केवळ पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आराेपीने या महिलेचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला. ही घटना रात्रीच्यावेळी घडली. मंगळवारी सकाळी पाेलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर लातूर ग्रामीणचे उपविभागीय पाेलीस अधिकारी सुनील गाेसावी, पाेलीस निरीक्षक गणेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आराेपी फरार असून, त्याच्या अटकेसाठी लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्याचे पथक मागावर आहे.
याबाबत लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात अजय साेनपारखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मदन ऊर्फ मनाेज कदम (रा. वासनगाव, ता. लातूर) यांच्याविराेधात गुरनं. २७१ / २०२२ कलम ३०२, २०१ भादंविसह कलम ३ (२) (व्ही) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास डीवायएसपी सुनील गोसावी करत आहेत.